मुंबई : लोकांनी ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली आत्मसात केली असली तरीही ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षण पद्धती’ने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये अति खाणे, ताण-तणावा अति खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी 30 % लोकसंख्येमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे ‘आयसीएमआर-इंडियाबी’ ने आपल्या अभ्यासात म्हटले आहे. कोविडने प्रत्येकाला उत्तम आरोग्य, आहार आणि बळकट प्रतिकार शक्ती कमावण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे सुदृढता राखण्यावर तसेच घरीच आरोग्याची देखरेख ठेवण्याकडे कल वाढला असल्याचे ही अभ्यासातील निष्कर्षात म्हटले आहे.

देशभरातील महत्वाच्या शहरांतील लोकांचा आरोग्यविषयक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. आपल्या लोकसंख्येच्या 30%  व्यक्ती लठ्ठ असू शकतात असा निष्कर्ष ‘आयसीएमआर -इंडियाबी’ने काढला आहे. पुढील 20 वर्षात 2040 पर्यंत विकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज ही व्यक्त करण्यात आला आहे.

Also Read: लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो पाहून जर्मनीतील अधिकारी संतापली

‘आयसीएमआर-इंडियाबी’ने जगभरात केलेल्या अभ्यासानुसार 135 दशलक्ष व्यक्ती लठ्ठपणा आणि वजन व्यवस्थापन समस्येने त्रस्त असल्याचे सांगितले होते. तर डिसेंबर 2020 दरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या 5 व्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणानुसार,  बहुसंख्य महिला लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त असून ग्रामीण भागांमध्ये ही आरोग्य समस्या वेगाने वाढत असल्याचे सांगितले होते.

लठ्ठपणाच्या या अभ्यासावरील निष्कर्षावरून वरून आरोग्य समस्या आणि त्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत ‘ओमरॉन हेल्थकेअर इंडिया’ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. लठ्ठपणाच्या समस्यांचे जीवनशैली विषयक विकारांशी घनिष्ठ संबंध आहे.लठ्ठपणामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यावर नियंत्रण ठेवायचे असल्यास आरोग्यनिगा व्यवस्थापन काळाची गरज असल्याचे ही म्हटले आहे. आपले आरोग्य उत्तम राखण्याकरिता वजन व्यवस्थापन हा मुख्य निकष असल्याचे अनेक जणांना वाटते. मात्र ते पुरेसे नसून त्यासाठी ‘बॉडी मास इंडेक्स’ सारख्या पद्धतींचा वापर महत्वाचा आहे. यामुळे शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी अनेक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे शक्य होते असे ‘ओमरॉन हेल्थकेअर इंडिया’तील अभ्यास गटाचे प्रमुख मसानोरी मत्सुबारा यांनी म्हटले आहे.

Also Read: Ashadhi Ekadashi: पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त विद्युतरोषणाई;पाहा व्हिडिओ

साधारणता 1975 पासून लठ्ठपणा वाढण्याच्या वारंवारतेत 3 पटीने वृद्धी झाली आहे. 2016 च्या आकडेवारी अनुसार, जगभरात 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 1.9 अब्जहून अधिक प्रौढ अति वजनदार तर त्यापैकी सुमारे 650 दशलक्ष लठ्ठ होते. 2020 च्या आकडेवारीनुसार 5 पेक्षा खालील वयाची जवळपास 39  दशलक्ष बालके लठ्ठ आढळून आली.

शरीराचा बीएमआय 30 किंवा त्याच्यावर असल्यास लठ्ठपणा आणि 25-30 बीएमआय असल्यास अति वजन असण्यावर शिक्कामोर्तब होतो. आपल्या शरीरात कमरेच्या खालच्या भागातील अवयवांच्या भोवती जमलेली चरबी म्हणजे बीएमआय संबंधी चरबी होय.यामुळे हृदय रोग, उच्च रक्त दाब, श्वसनाच्या समस्या व अन्य विकार उद्भवू शकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here