पावसाळा सुरु झाला आहे. त्यात बेस्ट आल्याचा चहा मिळाला तर काय विचारायलाच नको, परंतु दररोज सारखाच चहा आपल्याला प्यायला आवडत नाही. जर तुम्ही दररोज नवीन प्रकारच्या पद्धतीने चहा बनवलं तर कदाचित तुम्हाला ते आवडेल. अर्थात, भारतातील लोक त्यांच्या चवीनुसार विविध प्रकारचे चहा पितात, परंतु साध्या दिसत असलेल्या चहामध्ये किती बदल करता येतील याचा तुम्हाला कधी विचार आला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा 10 लोकप्रिय चहाच्या प्रकारांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा स्वाद तुम्हाला नक्की आवडेल.

काश्मिरी कहवा:
सुरवातीला केशरचे दोन स्ट्रॅंड्स कोमट पाण्यात घालून ठेवा. यानंतर उकळत्या चहामध्ये काश्मिरी चहाची पाने, लवंगा, वेलची, दालचिनी, मिरपूड इ. घाला आणि 3-4 मिनिटे उकळवा. यानंतर चहा गाळून घ्या. त्यामध्ये केशरचे पाणी मिसळा आणि सर्व्ह करा.
गुळाचा चहा :
हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला साखरेऐवजी गूळ वापरावा लागेल. गूळ अगदी शेवटी टाका त्यानंतर जास्त चहा उकळण्याची गरज नाही. गूळ थोडासा क्रश करा म्हणजे तो चहामध्ये चांगला मिसळा.
तुळशी चहा:
सुरवातीला चहापत्ती आणि 3-4 धुतलेल्या तुळशीची पाने पाण्यात उकळवा. यानंतर उरलेल्या चहाचे साहित्य घालून हा चहा खूप चवदार बनेल.
दालचीनी चहा:
रोजच्या चहामध्ये चहा उकळल्यानंतर त्यात दालचिनीची पूड (1/4 टीस्पून) किंवा दालचिनीचा तुकडा घालून चांगले उकळवा. हा चहा थोडासा शिजवावा लागेल कारण दालचिनीचा स्वाद आल्यानंतर चहाची कच्ची चव लागणार नाही.
मसाला चहा:
एकतर तुम्ही बाजारातून मसाला चहाची पूड आणा किंवा बडीशेप, वेलची, लवंग, दालचिनी, आले, काळी मिरी इत्यादी वापरा. जर आपण पावडर वापरत असाल तर अर्धा चमचा आणि आपण मसाले वापरत असाल तर सर्वकाही मिसळलेली पूड अर्धा चमचे घ्या. दुध उकळल्यानंतर त्यात मसाला घाला आणि थोडे उकळवा.
रोंगा साह चहा:
या चहामध्ये स्पेशल रोंगा साह आसामी चहाची पाने वापरली जातात, तरच त्याचा रंग लाल होतो. ते दुधाशिवाय बनवा आणि चहाच्या पानांचा रंग प्रथम लाल होईपर्यंत उकळावा, नंतर त्यात साखर, तुळस वगैरे घाला.
लवंग आणि वेलची चहा:
रोजच्या चहामध्ये चहापत्ती सोबत 4 लवंग आणि 1 वेलची घाला. जास्त वेलची घालू नका. आणि रोज चहा करताना शिजवता तसे चहा शिजवा.
लिंबु चहा:
चहापत्त्ती, थोडी साखर, लिंबाचा तुकडा पाण्यात उकळा. वर पुदीनाची पाने टाकून त्याचा आनंद घ्या.
सुलेमानी चहा:
या चहामध्ये 1.5 इंची दालचिनी स्टिक, पुदीनाची 2 पाने, 5-5 लवंगा आणि वेलची, 1 चमचे साखर घ्या. चहापत्ती टाका ते उकळवा. तसेच तुम्ही साखरेऐवजी मध किंवा गूळ देखील वापरू शकता.
हल्दी चहा:
हा चहा बनवण्यासाठी तुम्ही दूध आणि चहापत्तीसह थोडी हळद (एक किंवा दोन चिमूटभर) घाला. यात दाहक-विरोधी गुणधर्म (एंटी-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज) आहेत. हे सगळे एकत्र करुन चहाचा स्वाद घ्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here