बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्सने अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला, पण काही जण वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. पाहूयात असेच काही स्टार किड्स ज्यांनी हटके क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेताला.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता ही कॉलमिस्ट आहे. वेगवेगळ्या विषयावर ती कॉलम लिहीत असते.
रिद्धिमा कपूर ही अभिनेते
ऋषी कपूर आणि अभिनेत्री नितू कपूर यांची मुलगी आहे. रिद्धिमा ही ज्वेलरी डिझायनर आहे.
अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफचे स्वत;चे ‘एमएमए मॅट्रिक्स’ नावाचे फिटनेस सेंटर आहे.
रिया कपूर ही प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे. रियाची स्वत;ची फॅशन ब्रॅंड कंपनी आहे. तसेच तिने काही चित्रपटांची निर्मीती देखील केली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांची मुलगी एकता कपूरने अभिनेत्री होण्याऐवजी निर्मिती क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतवा. एकताने अल्ट बालाजी आणि बालाजी मोशन पिक्चर या प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली. एकताने अनेक मालिकांची निर्मीती केली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here