बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शेफाली शहा हिचा जन्म 20 जुलै 1972 रोजी झाला. अलीकडे नेटफिल्क्सवर प्रदर्शित झालेल्या ”अजिब दास्तां”वेबसिरिज मध्ये आणि 2015 साली प्रदर्शित झालेल्या दिल धडकने दो या चित्रपटामधील तिची भूमिकेची प्रशंसा करण्यात आली. शेफालीने साकारलेल्या अशाच काही हटके भूमिकांपैकी सर्वोत्कृष्ट भूमिकांबाबत जाणून घेऊ या.

बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी शेफालीचे, गुजराती नाटकांमध्ये, उल्लेखनीय भूमिका साकरल्यामुळे कौतूक झाले आहे. 1995 मध्ये तिने इंटस्टीमध्ये प्रवेश केला आणि अभिनय कौशल्याच्या प्रेक्षकाच्यां मनावर छाप टाकली. आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये, अभिनेत्रीने काही अत्यंत आव्हानात्मक पात्रं साकारली आहेत.

सत्या(Satya -1998)

भारतातील अंडरवर्ल्डचे वास्तववादी चित्र दाखविण्याऱ्या सत्या या चित्रपटाता प्यारी म्हात्रे हे पात्र शेफालीने साकारले होते. सत्या चित्रपटातील भूमिकेसाठी शेफालीला स्टार स्क्रिन अॅवार्डमध्ये बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर आणि फिल्मफेअर क्रिटिक्स अॅवॉर्डमध्ये बेस्ट अॅक्टर म्हणून नामांकन मिळाले होते.

मॉन्सून वेडिंग (Monsoon Wedding- 2001)
नसरुद्दीन शाह यांच्यासह भूमिका साकारलेला मॉन्सून वेडिंग हा चित्रपट शेफाली साठी ब्रेक थ्रू ठरला. या चित्रपटात शेफालीने रिया वर्मा नावाच्या बोल्ड महिलेची ही भूमिका साकारली आहे.

ब्लॅक अॅन्ड व्हाईट (Black & White – 2008)
सुभाष घई यांच्या ब्लॅक आणि व्हाईट चित्रपटात शेफाली शहा, अनिल कपूर आणि अनुराग शहा यांनी मुख्य भूमिका साकरली होती. या चित्रपटात शेफालीने अतिशय धडाडीच्या सामाजिक कार्यकर्तेची भूमिका साकारली आहे जीचे भूमिका एका अफगाण सुसाईज बॉमर भोवती फिरत राहते. या चित्रपटाला पुणे आणि दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली.

गांधी, माय फादर (Gandhi, My Father -2007)
गांधी, माय फादर हा महात्मा गांधी आणि त्यांच्या मुलगा हरिलाल गांधी यांच्या नात्याभोवती फिरणारा चरित्र नाटक चित्रपट होता. या चित्रपटात शेफालीने कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारली होती. या भुमिकेसाठी शेफालीचे कौतुक झाले होते.

दिल्ली क्राईम (Delhi Crime- 2019)
दिल्ली क्राईम या नेटफिल्क्सवर प्रदर्शित झालेल्या रिची मेहता यांच्या क्राईम थ्रिलर वेबसिरिजमध्ये तिने डीसीपी वर्तिका चतुर्वेदी ही भूमिका साकारली. शेफालीने साकारलेल्या भूमिकांपैकी अत्यंत प्रतिभाशाली भूमिकाही दिल्ली क्राईम मधील मानली जाते. ही भूमिका साकारताना तिने तिचे खरे अष्टपैलु आणि तिची पात्रे साकारण्याची क्षमता दर्शविली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here