कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशीचा सोहळा रद्द झाल्याने विठ्ठल मंदिर परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते. करहर बाजारपेठत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कुडाळ (सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशीचा सोहळा रद्द झाल्याने विठ्ठल मंदिर परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते. करहर बाजारपेठत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे दर्शनास विठ्ठलचं देऊळबंद झाल्याने विठ्ठल भक्तांना सलग दुसऱ्या वर्षी नाराज व्हावं लागलं!
करहर (ता. जावळी) येथील स्वयंभू विठ्ठलाचं स्थान असलेल्या प्रतिपंढरीत प्रत्येकवर्षी विठ्ठल हरिनामाच्या गजरात गावोगावांवरून येणाऱ्या पालख्यांनी हा सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गाने त्यावर विरजण पडले आहे.
यावर्षी कडक निर्बंध लागू असल्याने भक्तांचा आनंदच हिरावला गेला, तर जिल्हा पोलीस आणि आरएसएस फोर्स यांनीच सोमवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून करहर परिसरात संचारबंदी लागू झाल्यापासून ताबा घेतल्याने विठ्ठल मंदिर भाविकांस बंद झाले. जागोजागी फक्त पोलीस आणि आरएसएसची फौज हेच दृश्य नजरेस पडत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या सूचनेनुसार करहरचे ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे यांनी सुमारे ६० ते ७० पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here