नागपूर : अनेकांना नेहमी हेअरस्टाईल चेंज करण्याची सवय असते. आपली हेअरस्टाईल चांगली दिसावी असे त्यांना वाटते. मात्र, यासाठी केसांची काळजी घेणे फार गरजेचे होऊन जाते. केस छोटे असले म्हणून काय झाले त्याच्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. केसांची चमक टिकून राहावी आणि कोणतीही हेअरस्टाईल चांगली दिसावी यासाठी काय करता येईल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Hair-style-Hair-needs-to-be-taken-care-New-Style-Boys-Hair-News-nad86)

केसांवर फार प्रयोग करू नका. विविध उत्पादनांचा मारा करू नका. जेल किंवा स्प्रे अगदी कमी प्रमाणात लावा.
आंघोळ करताना मुलं रोज केस धुतात. काही मुलं केसांना साबण लावतात. परंतु, असे केल्याने केसांमधले नैसर्गिक तेल नष्ट होते. केसांच्या मुळाशी असलेल्या तेलामुळे केसांमधला ओलावा टिकून राहतो. दररोज केस धुतल्याने हे तेल नष्ट होते आणि केस कोरडे होतात. त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा केस धुवा.
केसांना नुसते शँपू लावून भागणार नाही. स्कॅल्पलाही नीट शँपू लावा. यामुळे स्कॅल्पवरची धूळ आणि घाण निघून जाईल.
केसांसाठी कोणताही शँपू वापरू नका. नैसर्गिक घटकांनी युक्त शँपूचाचा वापर करा. तुमचा शँपू सल्फेट आणि पॅराबेन फ्री असावा.
घाईगडबडीत अनेकांना पटपट केस धुण्याची सवय असते. यामुळे केस गळू लागतात. म्हणूनच हलक्या हातांनी केस पुसा.
कंडिशनरचा वापर टाळू नका. कंडिशनरमुळे केसांना ओलावा मिळतो. केस छान मुलायम होतात.
आठवड्यातून एकदा केसांना तेल लावा. यामुळे केसांमधला ओलावा टिकून राहील. कुरळे केस असणाऱ्या मुलांनी नियमित तेल लावायला पाहिजे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here