जळगाव ः जिल्हा कोविड रुग्णालय (Covid Hospital) आता नॉन कोविड (Non covid)(सिव्हील) करून तेथे पूर्ववत सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे (Jalgaon Collector) आहेत. यामुळे आता जिल्हा कोविड रुग्णालयात सर्व वॉर्डची स्वच्छता, सॅनिटायझेशनची कामे सुरू झाली आहे. तर मोहाडी येथे पाचशे बेड ऑक्सीजनयूक्त (Oxgen Bed) तयार करण्यात आले आहेत. गुरूवारपासून (ता. २२) कोविडचे रुग्ण मोहाडी येथील महिला रुग्णालयात (Mohadi Women’s Hospital Covid Center) दाखल केले जातील. त्यादृष्टीने स्टाफ व खाटांची व्यवस्था केली जात आहे.

(marathi news jalgaon mohadi womans hospitel covide center ready)

Also Read: कोरोनामुळे पिंप्राळ्याचा रथोत्सव साधेपणाने; पाच पावले रथ ओढला

कोरोना महामारी मार्च २०२० मध्ये सुरु झाली. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी (जिल्हा कोविड रुग्णालय) घोषित केले. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यावर १७ डिसेंबर २०२० ला कोरोनाविरहित (नॉन कोविड) करण्यात आले होते. दुसरी लाट आल्यानंतर २० मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परत कोरोनाबाधित रुग्णांसाठी घोषित केले. तेव्हापासून कोरोनाविरहित रुग्णांना उपचार बंद आहेत.

Covid Hospital

तिसऱ्या लाटेच्या संभाव्य तयारी

आता दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेच्या संभाव्य तयारीसाठी जिल्हाधिकारी आढावा घेत आहे. त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी असून येथे आजपर्यंत सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्ण ११ (५ अतिदक्षता विभागात), नवजात शिशु विभागात ९ तर म्युकरमायक्रोसिसचे १० रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाविरहित रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हील) हे खुले व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होती. त्यामुळे येत्या २२ जुलैपासून जिल्हा रुग्णालय सर्वसामान्यांसाठी पूर्ववत कार्यरत होणार आहे.

Also Read: ओडिशाच्या उदयगिरी, खंडागिरी लेण्या पर्यटकांसाठी खास आकर्षक!

शंभरापेक्षा अधिक स्टाफ मोहाडी रुग्णालयात देण्यात आला आहे. ४५ व्हेंटीलेटर, २० आयसीयू बेड, ५०० ऑक्सीजनयुक्त बेड येथे आहेत. वैद्यकीय अधिक्षक म्हणून डॉ.तासखेडकर यांची नियूक्ती करण्यात आली आहे. जसजसे कोरोना बाधीत येथे दाखल होतील त्यांच्यावर येथे उपचार केले जातील.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here