हरियाणातील पुरातत्वशास्त्रज्ञांना प्रागैतिहासिक काळातील एका गुहेचा शोध लागला आहे. या गुहेमध्ये चित्रेही काढलेली दिसून आली आहेत. ही चित्रे जवळपास एक लाख वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. हरियाणातील फरिदाबादमधील मंगर बानी हील फॉरेस्टमध्ये ही चित्रे आढळून आली आहेत.
टूल टॉपोलॉजीच्या आधारावर असं म्हटलं जाऊ शकतं की, या जागेवरील प्रागैतिहासिक वस्ती सुमारे 1,00,000 ते सुमारे 15,000 वर्षांपूर्वीची असू शकते. परंतु आम्हाला नंतरच्या काळातील म्हणजे अगदी इ.स. आठव्या ते नवव्या शतकापर्यंत वस्तीचा पुरावा देखील सापडला आहे, असं हरियाणा पुरातत्व व संग्रहालये विभागाच्या उपसंचालक बनानी भट्टाचार्य यांनी म्हटलंय. पहिल्यांदाच दगडाच्या निवाऱ्यासह एवढा मोठा प्रदेश सापडला आहे.
असं म्हटलं जाऊ शकतं की, हे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे पॅलेओलिथिक साइट्सपैकी एक असू शकते, जिथे दगडाच्या युगची साधने वेगवेगळ्या खुल्या हवेच्या ठिकाणांवर तसेच खडकांच्या आश्रयस्थानांतून सापडल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, हरियाणामध्ये पहिल्यांदाच प्रागैतिहासिक काळातील गुहेतील चित्रे आणि दगडी कलेचा नमुना असलेलं ठिकाण सापडलं आहे. परंतु, याआधी अरवलीच्या भागांमध्ये पॅलेओलिथिक काळातील साधने सापडली आहेत.
गेल्या मे महिन्यात पर्यावरणीय कार्यकर्ते सुनील हरसाना यांनी मंगर बानी टेकडीच्या जंगलात प्रागैतिहासिक गुहेचे चित्रे पाहिली होती. त्यानंतर संशोधकांनी अधिक संशोधन सुरु केले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here