Sri Lanka vs India, 2nd ODI : भारतीय संघा विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार शनाका याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने निर्धारित 50 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 275 धावा केल्या. भारताचा प्रमुख गोलंदाज आणि श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) श्रीलंकेच्या तीन गड्यांना तंबूत धाडले. 10 षटकांच्या आपल्या कोट्यात त्याने 54 धावा खर्च करून या तीन विकेट घेतल्या. यात त्याने एक नो बॉल आणि एक वाईड चेंडू फेकला.

सहा वर्षानंतर आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने नो बॉलच्या रुपात अवांतर धाव दिलीये. 3093 चेंडूनंतर त्याने श्रीलंके विरुद्ध नो बॉल फेकला. यापूर्वी 2015 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भुवीने नॉ बॉल टाकला होता. श्रीलंकेकडून चरिथ असालंका आणि सलामीवीर अविष्का फर्नांडो यांनी अर्धशतके झळकावली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारत 50 षटकात 9 बाद 275 धावा केल्या.

Also Read: गोल्डन गर्ल राहीच्या यशस्वी प्रवासाची कहाणी;पाहा व्हिडिओ

असलंकाने 68 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 65 धावांची केलेली खेळी श्रीलंकन संघाकडून सर्वोच्च ठरली. त्याच्या पाठोपाठ फर्नांडोने 71 चेंडूत 50 धावा केल्या. चमिका करूणारत्ने 33 चेंडूत नाबाद 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे 10 ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संघाने 79 धावा कुटल्या. करूणारत्नेनं असलंकाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. भारताकडून फिरकीपटू चहलने 50 धावा खर्च करुन तीन विकेट घेतल्या. भुवीने 54 धावांत तिघांना माघारी धाडले. तर दीपक चाहरने 53 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या.

Also Read: UAE ला जाण्यापूर्वी धोनीचा संघ चेपॉकमध्ये ठोकणार तंबू

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here