आज अनेक लोक डायबिटीजच्या समस्येवर झगडत आहेत. हा रोग कमी करण्यासाठी योग्य माहिती आणि योग्य आहाराची आवश्यकता आहे. फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात पण काही फळे अशी असतात की डायबिटीजमध्ये खाऊ नये असे म्हणले जाते. कारण या फळांचे सेवन केल्याने डायबिटीजची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. वास्तविक, डायबिटीजमध्ये बर्‍याच खाद्यपदार्थांना खाण्यास मनाई आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही खाऊ शकत नाही. तर, आज आम्ही तुम्हाला अशा फळांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही डायबिटीजमध्ये खाऊ शकता. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सफरचंद : सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सफरचंदमध्ये कॅलरीची मात्रा कमी आणि फायबर, अँटीऑक्सिडंट्स जास्त असल्याचे आढळते. डायबिटीज रूग्ण त्यांच्या आहारात सफरचंद समाविष्ट करू शकतात.
किवी : किवी हे एक आंबट आणि मधुर फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. किवीचे सेवन डायबिटीजसाठी उपयुक्त ठरू शकते. किवीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सारख्या अँटीऑक्सिडेंट असतात जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात.
संत्री : संत्री हा व्हिटॅमिन सीचा चांगला सोर्स मानला जातो. संत्री ग्लायसेमिक इंडेक्समध्ये कमी असते आणि त्यामध्ये आढळणारा फोलेट रक्तदाब राखण्यास देखील मदत करू शकतो.
डाळिंब : डाळिंबामध्ये फ्लाव्हानोईन, फिनोलिक्स, व्हिटॅमिन सी, फायबरचे गुणधर्म आहेत. याशिवाय एंटीडायबेटिक गुणधर्म देखील असल्याचे आढळून आले जे डायबिटीजच्या रुग्णांना चांगले आहे. डाळिंब खाल्यास डायबिटीज कमी होतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here