रत्नागिरी : उन्हाळी सुटीसाठी रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने चार समर स्पेशल जाहीर केल्या आहेत. या गाड्या ३ एप्रिलपासून ८ जूनपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. या चार गाड्यांच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
उन्हाळी सुटीत पर्यटकांसह चाकरमानी मुंबईहून कोकणात आणि गोव्याकडे दाखल होतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्यांचे दरवर्षी नियोजन केले जाते. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी समर स्पेशल, पनवेल-करमाळी, लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता चार समर स्पेशल
८ जूनपर्यंत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे परतीच्या प्रवासही सुखकर होण्यास मदत होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक रेल्वेगाडी ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी १०.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ५ एप्रिल ते ७ जून धावणारी ही गाडी दर रविवारी करमाळी येथून सकाळी ११ वाजता सुटून रात्री १२.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २२ डब्यांच्या या गाडीला ठाणे,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वररोड, रत्नागिरी, राजापूररोड, वौववाडीरोड, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, सावंतवाडीरोड, थिविम आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हेही वाचा– रत्नागिरीत राजीनामा देण्यासाठी तिच्यावर टाकला दबाव परंतु ..
साप्ताहिक रेल्वेगाडी वेऴापत्रक
पनवेल-करमाळी साप्ताहिक रेल्वेगाडी ४ एप्रिल ते ६ जून या कालावधीत धावेल. दर शनिवारी पनवेल येथून दुपारी १ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळीला पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक रेल्वेगाडी १० एप्रिल ते ५ जून दरम्यान धावेल. दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून सकाळी १२.२० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी साप्ताहिक रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावणार ही गाडी दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १.१० वाजता सुटून सकाळी १२.३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी दुपारी १.३० वाजता सावंतवाडी येथून सुटून रात्री १२.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

News Story Feeds