पुणे : पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कोंढवा बुद्रुक येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विसापूर किल्ल्याला भेट देऊन तेथे वृक्षारोपन केले
किल्ला परिसरात प्लॅस्टिक कचरा गोळा करणे, किल्ल्याचे संवर्धन करणे व आपल्या या महाराष्ट्राला लाभलेल्या गडकोटांची महत्त्वाकांक्षा पटवून देणे इत्यादि उपक्रम राबवले.
आपली सामाजिक जबाबदारी निभावणारे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसीचे रासेयो अधिकारी प्रा. रमेश गाडेकर तसेच रासेयो स्वयंसेवक वैभव कुंटे, अविनाश गलधर, सिद्धांत मामीडवार, अंकिता सरडे, प्रतीक्षा जाधव तसेच इतर स्वयंसेवक सदर उपक्रमात सहभागी होते
वृक्षारोपन उपक्रमामध्ये भाग घेत विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली
यावेळी प्रा. रमेश गाडेकर यांनी सर्व स्वयंसेवकांना पर्यावरणाविषयी योग्य मार्गदर्शन केले.
सदर उपक्रमाचे नियोजन रा से यो अधिकारी प्रा. रमेश गाडेकर यांनी प्राचार्य डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here