कळवण (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona virus) प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून बंद असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंग गडावरील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या दरबारी आर्जव करत मंदिर उघडण्याची आर्त हाक दिली. स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
(The-villagers-requested-Chhagan-Bhujbal-to-open-Saptashrungi-temple-jpd93)
भगवती मंदिर हाच अर्थचक्राचा प्रमुख स्त्रोत
रविवारी (ता.१८) सप्तशृंग गडावरील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी श्री. भुजबळ यांची नाशिक येथे भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मार्चपासून गड दर्शनासाठी बंद आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगगड तिर्थक्षेत्राचा परिसर हा संपूर्णतः दुर्गम व गरीब लोकवस्तीचा असून, येथील संपूर्ण अर्थकारण हे श्री भगवती मंदिर व भाविकांच्या संबंधित असलेल्या विविध सेवा सुविधांवर आहे. मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या मंदिर बंद प्रक्रियेमुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. अर्थचक्राला पूर्ववत करण्यासाठी मंदिर व त्यासंबधित सर्व सेवा सुविधा शासकीय नियमांतंर्गत सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. सप्तशृंग गड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे, शांताराम गवळी, योगेश कदम, बंटी गुरव ,बाबा तिवारी, कैलास सदगीर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू बर्डे, राजेश गवळी,शांताराम सदगिर उपस्थित होते.
(The-villagers-requested-Chhagan-Bhujbal-to-open-Saptashrungi-temple)

Also Read: ऐकलं का! उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची ‘मन की बात’
Also Read: लसीचा एकच डोस झाल्यास प्रवासादरम्यान चाचणीचे बंधन
Esakal