नागपूर : शेवग्याची भाजी आपल्यापैकी अनेकांना आवडते. आजकाल मोठमोठ्या हॉटेलमध्येही विविध पदार्थांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जातो. परंतु, या शेवग्याच्या शेंगांचे अनेक लाभ आहेत. आमटी, सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात. शेवग्यामुळे पदार्थाला छान चव येते. शेवग्याच्या शेंगांइतकाच त्याचा पालाही औषधी आहे. आज जाणून घेऊया या पाल्याच्या लाभांविषयी.. (Helpful-For-Body-Health-Fitness-News-nad86)

शरीरातील चरबी जाळण्यासाठी शेवग्याच्या पाल्याचे सेवन करायला पाहिजे. या पाल्याची पूडही खाता येईल. यामुळे वजन झपाट्याने कमी होते.
शेवग्याच्या पाल्यात क आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. ही जीवनसत्त्वे अँटीऑक्सिडंटचे काम करतात. या पाल्याच्या नियमित सेवनामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो.
या पाल्यामुळे शरीरात सेरोटॉननचे प्रमाण वाढते आणि नैराश्य, ताण कमी व्हायला मदत होते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हार्मोन्स असंतुलनाची समस्या भेडसावते. हार्मोन्सचे असंतुलन दूर करण्यासाठी शेवग्याच्या झाडाचा पाला खावा.
महिलांनी मासिक पाळीदरम्यान हा पाला खावा.
या पाल्यात दाह कमी करणारे गुण असतात. त्यामुळे मधुमेहींनी या पाल्याचे सेवन करावे.
शेवग्याच्या पाल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. यामुळे त्वचा तजेलदार दिसू लागते. या पाल्यामुळे त्वचेत नव्या पेशींची निर्मिती व्हायला मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here