जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा कोविड रुग्णालय) (Government Medical College and Hospital) कोरोनाविरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) (Non covid) खुले करण्याचे आदेश असल्याने उद्यापासून (ता.२२) सर्वसामान्य रुग्णांची तपासणी (Check), औषधोपचार(Medication), शस्त्रक्रिया (Surgery)येथे सुरू होणार आहे.
(jalgaon government medical college and hospital tomorrow civil facilities)

Also Read: दार्जिलिंगच्या सहलीवर आहात..तर या ठिकाणांना नक्की भेट द्या!

कोरोना बाधीतांची संख्या कमी झाल्याने जिल्हा कोविड रुग्णालय नॉन कोविड करण्याबाबत लेखी अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठविला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जुलैपासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोरोनाविरहित उपचारासाठी सुरू करण्यास मंजूरी दिली होती. त्यानूसार उद्यापासून सिव्हील हॉस्पीटल पूर्ववत सुरू होईल. तर कोरोना महामारीच्या रुग्णांवर मोहाडी येथील महिला रुग्णालयात उपचार होणार आहेत. कोरोना नसलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सी २ या कक्षातच उपचार सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयाची आज सर्वत्र स्वच्छता करून र्निजंतूकीकरण करण्यात आले आहे. आज दिवसभर रुग्णालयाचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाची स्वच्छता केली आहे.

अशी आहे प्रवेशक्षमता…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व वयोगटांसाठी अतिदक्षता विभाग, साधारण असे सर्व मिळून ३८६ ऑक्सिजन खाटा आहेत. तसेच मोहाडी स्त्री रुग्णालयात ५०० ऑक्सिजन खाटा तर अतिदक्षता विभागात १५ खाटा आहेत.

Also Read: मुलाला वडीलांची काळजी..आणि तयार केले वीजपुरवठ्याचे डिव्हाईस

..

कोरोना सोडून इतर आजारांवर उपचार करण्यासाठी सामान्य नागरिकांची गैरसोय होत होती. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे. नागरिकांना २१ विविध विभागाद्वारे वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here