देहू : रस्त्याच्या कडेला नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी देहू आणि येलवाडी गावांना जोडणाऱ्या पुलाच्या एका टोकाला कोणीतरी नागरिकांनी चक्क देवांनाच कचऱ्याच्या ठिकाणी स्थापन केल्याचा प्रकार देहू (dehu) येथे घडला आहे. देवाच्या प्रतिकृती ठेवल्याने नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकण्याचे बंद केले आहे. त्यामुळे येलवाडी ते देहू (dehu) देऊळवाडा दरम्यान असलेल्या पुलावर घाणीचे साम्राज्य कमी झाले आहे. (God came running carrying the garbage gone dehu)

माणूस कोणत्याही संकट समयी देवाचा धावा करतो आणि त्या संकटातून तो वाचला की देवाचे आभार मानतो. ऐनवेळी देवाचा आधार घेणे हे मानवी स्वभावाचे वैशिष्ट आहे. त्यातल्या त्यात श्रद्धाळू माणूस आणि अंधश्रद्धाळू माणूसही संकटसमयी देवाचा धावा करतो. वाचलो की देवाचे आभार मानतो. असाच काहीसा प्रकार देहूतील इंद्रायणी नदी काठी घडला आहे. देहू आणि येलवाडी(ता.खेड) या गावांना जोडण्यासाठी इंद्रायणी नदीवर पूल आहे. देहू हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे सतत भाविकांची वर्दळ असते. तसेच, नागरिकही सुजाण आणि जागरूक आहेत.

त्यामुळे देहू नगरपंचायत प्रशासन नागरिकांना आणि भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याची काळजी घेते. येलवाडी हे “क” तीर्थक्षेत्र दर्जा असलेले गाव आहे. या गावात संत तुकाराम महाराजांची कन्या भागिरथीचे सासर आहे. सध्या गावाची लोकसंख्या वाढली. शेती विकून शेतकरी मालामाल झाले. तसेच बाहेरगावाहून आलेले नागरिकांनी घेतलेल्या जमिनीवर घरे, बंगले, सोसायटी उभ्या केल्या. मात्र, येलवाडी गावाचे ग्रामपंचायत प्रशासन वाढलेल्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी कमी पडत आहे. येथील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात.

Also Read: कात्रजमध्ये राज्यातील पहिले शेकरू प्रजनन आणि रानमांजर केंद्र

तसेच तळेगाव, चाकण, महाळुंगे एमआयडीसीत कामाला जाणारे कामगारही येलवाडी गावातून जातात. रस्त्याच्या कडेला आपल्या चारचाकी वाहनातून वाटेवरच कचरा टाकतात. त्यामुळे दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढिग साचलेले असतात. या पार्श्वभूमीवर देऊळवाड्याजवळील इंद्रायणी नदीच्या दुसऱ्या तीरावर येलवाडी गावाच्या हद्दीत कोणीतरी व्यक्तीने कचरा ज्या ठिकाणी नागरिक टाकत होते त्या ठिकाणीच देव स्थापले आहेत.

Also Read: डॉ. प्रमोद चौधरी वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार पदी

गेले चार दिवसांपासून या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले आहे. त्यामुळे देवानेच तारले, असे म्हटले तर वावगे होणार नाही. नाहीतर येलवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने कचऱ्यासाठी घंटागाडी फिरवली.नागरिकांना वारंवार आव्हान केले. मात्र, सूज्ञ नागरिकांनी ऐकले नाही. शेवटी पर्याय म्हणून दगडाला शेंदूर लावून देवच त्या ठिकाणी स्थापल्याने कचरा टाकण्याचे नागरिकांनी थांबविले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here