एका संशोधनानुसार लॉकडाऊननंतर ऑनलाईन डेटिंगचे प्रमाण खूप वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग आणि सुरक्षेच्या विचार करता एकमेकांसोबत ओळख वाढविण्यासाठी लोक ऑनलाईन डेटिंगचा वापर करत आहेत. ऑनलाईन डेटिंगसाठी प्रोफाईल तयार करणे, ते नियमित अपडेट करत राहणे आणि ऑनलाईन फ्रॉडपासून स्वत:चा बचाव करणे हे काही कमी स्ट्रगल नाही. तरीही आपले प्रोफोईल इंट्रेस्टिंग दिसावे यासाठी आपल्या आवडी निवडी, आपले गुण अशा गोष्टी अपडेट करतात. तथापि पुरुष आणि महिला डेटिंग प्रोफाईल चेक करताना वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत असतात.

तुमचे प्रोफाईल आकर्षक किंवा इंट्रेस्टिंग नसेल किंवा त्यात काही चूक असेल तर तुमच्यासोबत कोणीही मैत्री करेल यांची संभावना कमी आहे. याबाबतीत मुल फार निष्काळजीपण करतात आणि चुकीच्या गोष्टी आपल्या प्रोफाईलमध्ये अॅड केल्यामुळे खूप डेस्परेट असल्याचे दिसते.

तुमचा प्रोफाईल फोटो जुना तर नाही?

प्रोफाईल फोटो हा साधारणतन लोकांना अॅक्ट्रक करण्यासाठी उपयूक्त ठरतो. त्यात तुमचा फोटो जर जुना किंवा ब्लर असेल तर ऑनलाईन डेटिंग करताना तुम्हाला खूप तक्रारी येतील की जसे तुम्ही प्रोफाईलमध्ये दिसत आहात तसे नाही आहात.

प्रोफाईल अपडेट करत राहा

ऑनलाईन डेटिंगचा विचार करताना, महिला प्रोफाईल फोटो सोबत तुमची सत्यता देखील पडताळतात. तुमचे प्रोफाईल तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूप काही सांगतो. त्यामुळे लेटेस्ट माहितीसोबत प्रोफाईल अपडेट करत राहा.

Bio रिकामा सोडू नका

ऑनलाईन डेटिंग फक्त टाईम पास म्हणून वापण्याचा जमाना आता गेला. आजच्या काळात लोक जास्त करुन परफेक्ट पार्टनच्या शोधात या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.अशामध्ये जर तुम्ही लाँग-टर्म रिलेशशिप साठी ऑनलाईन डेटिंग वापरत असाल तर तुमचा Bio रिकाम राहणार नाही याकडे लक्ष द्या. त्याशिवाय समोरचा व्यक्ती तुमच्या कनेक्ट होऊ शकणार नाही. तुम्हाला जास्त माहिती द्यायची नसेल तर फक्त महत्वाच्या गोष्टी लिहू शकता.

सेक्सुअल ह्यूमर

प्रोफाईलमध्ये अशाही काही गोष्टी असतात ज्यामुळे रिलेशनशिपमध्ये आल्यानतंर महिलांचा मूड खराब करु शकतात आणि त्याचे कारण तुम्हाला कधीच समजणार नाही. जर तुम्ही जास्त सेक्सुअल कंटेट शेअर करत असाल तर त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. तुमच्या प्रोफाईलमध्ये खूप सारे कन्वर्सेशन स्टार्टर देणे गरजचे असते. अशा वेळी तुम्ही ज्या शब्दांचा वापर करता त्यावरुन तुमची पर्सनॅलिटी हाईलाईट होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here