दोडामार्ग (सिंधुदूर्ग) : एसटी वाहकाच्या प्रामाणिकपणाचे दर्शन आज संपूर्ण जिल्ह्याला झाले. महाशिवरात्रीनिमित्त एसटी बस पूर्णपणे भरलेली असताना एका मासे विक्रेत्या महिलेच्या कापडी पिशवीत मिळालेले 18 हजार रुपये वाहक अमोल हरी धाऊसकर यांनी त्या महिलेला परत केले.
सावंतवाडी केर निडलवाडी बस घेऊन चालक अस्लम शेख (रा. साटेली भेडशी, आवाडे) आणि वाहक अमोल धाऊसकर (रा. सासोली हेदूस) केर निडलवाडीला जात होते. मासे विक्रेत्या श्रीमती ठाकूर साटेली-भेडशीत चढल्या आणि कोनाळकट्ट्यात उतरल्या. गाडी निडलवाडीला पोचल्यावर श्री धाऊसकर यांना पानाच्या चंचीसारखी कापडी पिशवी दिसली. त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यात 18 हजार रुपये असल्याचे दिसले. त्यांनी ती पिशवी सावंतवाडी आगारात जमा करण्याचा विचार केला.
हेही वाचा- सुटीवर आलेल्या जवानाचा प्रियकरासोबत काढला पत्नीने काटा…
वयोवृद्ध महिलेला अश्रू झाले अनावर
दरम्यान, ते परत कोनाळकट्टा येथे आले असता श्रीमती ठाकूर यांनी गाडीत आपली पिशवी मिळाली का, त्यात व्यवसायातील, कष्टाचे अठरा हजार रुपये असल्याचे सांगितले आणि त्या रडूच लागल्या. श्री. धाऊसकर यांनी त्यांना धीर देत ती पिशवी सर्वांसमोर त्यांच्या ताब्यात दिली. त्या वयोवृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले. त्यांनी वाहक धाऊसकर यांचे आभार मानून आशीर्वाद दिले. जगातील प्रामाणिकपणा संपला, असे वाटत असताना वाहकाने प्रामाणिकपणा दाखवून अजूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले. निकोप समाजासाठी ही गोष्ट आदर्शवत आणि दिलासादायक म्हणावी लागेल.
हेही वाचा- सिंधुदूर्गात सर्जेकोट गावाने आणला नवा पॅटर्न… कसा तो वाचा..
धाऊसकरांच्या कार्याचे कौतुक
यापुर्वीही श्री धाऊसकर यांना दोडामार्ग-सावंतवाडी मार्गावर एसटीत एक पर्स मिळाली होती. त्यात सोन्याची चेन होती. ती पर्सही त्यांनी सावंतवाडी आगारात जमा केली होती. ती पर्स आणि सोनसाखळी मणेरी येथील एका महिलेने ओळख पटवून नेली होती. श्री धाऊसकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर तीन वर्षे चालक म्हणून काम करत होते. अलिकडे तीन महिन्यांपुर्वी ते राज्य परिवहन मंडळात चालक -वाहक म्हणून नोकरीला लागले आहेत. सोने अथवा पैसे सापडले, की अनेकांची बुद्धी भ्रष्ट होते; पण श्री धाऊसकर यांनी कसलाच मोह न बाळगता ती चेन आणि आज सापडलेली रोकड मूळ मालकाला परत दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

News Story Feeds