नाशिक : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेले ३-४ दिवस पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना (ता.22) घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालं आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा लोकलला सेवा ठप्प असून इतर सर्व मार्ग संथ गतीने सुरू आहे. (landslide-on-railway-line-in-kasara-ghat-marathi-news-jpd93)

रेल्वे ढिगारा बाजूला हटवण्याचे काम हाती

दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे ढिगारा बाजूला हटवण्याचं काम हाती घेतलं. यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नजर ठेवून आहेत. तातडीने रेल्वे वाहतूक सुरू करता यावी, यासाठी दरड हटवण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात असून, त्यासाठी मातीचे ढिगारे हटवणाऱ्या ट्रेन्स, विविध मशिन्स आणि मजूर सध्या काम करत आहेत.

कोणत्या ट्रेन्स सुरू? कोणत्या बंद?

दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे रेल्वे रुळांचं प्रचंड नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी रुळांवर कमरेइतकं पाणी साचलं. दरड कोसळल्यानंतर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक सुरू आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गाडीच्या प्रतिक्षेत प्रवाशी

दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे ढिगारा बाजूला हटवण्याचं काम हाती घेतलं. यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नजर ठेवून आहेत. तातडीने रेल्वे वाहतूक सुरू करता यावी, यासाठी दरड हटवण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात असून, त्यासाठी मातीचे ढिगारे हटवणाऱ्या ट्रेन्स, विविध मशिन्स आणि मजूर सध्या काम करत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here