राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ यांसारख्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणं जलमय झाले आहेत.
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील अनेक घरांमध्ये पाणी साचलं आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
टिटवाळा येथे नवीन उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचा तळमजलादेखील पाण्याखाली गेला आहे.
टिटवाळा – गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवून टाकली आहे.
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ यांसारख्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणं जलमय झाले आहेत.
टिटवाळ्यातील रिजन्सी संकुल येथे असलेल्या ८ ते १० इमारतींना फटका बसला असून गायत्रीधाम, घर आंगण या इमारतींच्या परिसरात पाणी साचलं आहे.
मोहने पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पश्चिम ब प्रभागचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here