जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे.

रत्नागिरी: मुसळधार पावसानं थैमान घातलं असून खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर ला पुरस्थिती आली आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे. टेंभे येथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. पहा जिल्ह्यात कुठे कुठे काय स्थिती आहे ती…

Also Read: Konkan Rain – रत्नागिरी जलमय; पुराचे पाणी रस्त्यावर

दापोली वेळणे येथील प्रदीप कुळये यांच्या घरातील भिंत कोसळल्याने अंशतः नुकसान झाले आहे. कांदीवली येथील सुरेश शंकर चव्हाण व मनिषा शिंदे यांच्या घरातील जीवीतहानी झाली नाही. खेड शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मदत कार्य सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ येथील अर्जुना नदी ची पाणी पातळी वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बं. चिपळूण खेड – दापोली खेड – बैरव अतिवृष्टीमुळे वाहतूक मार्ग बंद आहे. खेड येथे मोहल्ला ख्वाजा सौमील व सफामज्जीद चौक गॅस खतीब यांच्या घरात पानी शिरल्याने व वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Also Read: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

चिपळूण शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मौजे गोवळकोट वर हीलम अपार्टमेंटला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून नुकसान जीवीतहानी नाही. खेडी येथील महावितरणचे ३ कर्मचारी उपविभागीय विदयुत कार्यालयात पाणी शिरल्याने अडकून पडले आहेत. भोर- वरंधा मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मांडकी येथील दत्तात्रय भास्कर पाध्ये यांच्या घराचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. पेटमाप येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही.

Also Read: रत्नागिरी, सिंधुदुर्गात धुवांधार; म्हाळुंगेत घराला तडे

मौजे मळेवाडी येथील पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण येथे शंकरवाडी येथे पावसाचे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण बाजारपेठ ओतूर गल्ली येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण येथे कळंबस्ते मध्ये महिपत कदम यांच्या घरात पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान. गंगोवा पाबर रोड येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान. शिवाजी चौक येथे घुडेकर यांच्या घरात पाणी शिरल्याने घराचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. गोगावे येथे रविंद्र गोविंद शिंदे यांचे दोन बैल वाहून गेले.

Also Read: Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क

तालुका संगमेश्वर

निवदे येथील बावनदीवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कासे पुलावर पाणी भरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बावनदीचे पाणी निवेखुर्द येथे रस्त्यावर आल्याने रस्ता बंद आहे. मौजे धामणी येथील पुराचे पाणी असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. वांद्री येथे विजेचे पोल रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद.

Also Read: रत्नागिरी समुद्र किनारी आहेत सॉफ्ट कोरल्स प्रवाळ प्रजाती

तालुका रत्नागिरी

मौजे चांदराई बाजारपेठेत पाणी शिरल्याने बाजारपेठेत अंशतः नुकसान, मौजे निवळी येथील बावनदी वर पाणी पातळी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोजे सोमेश्वर रत्नागिरी रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी ते सोमेन्चर-लोणदे-चिचखरीला जाणारा मार्ग बंद आहे. उक्शी येथे अन्वर गोलांजी यांच्या घरात पाणी भरल्याने घराचे अंशतः नुकसान. तहसीलदार निवळी येथे शेललवाडी व निवलकर यांच्या घरात पाणी भरले आहे. हरचेरी येथे पाणी भरल्याने घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. टेंभ्ये बौध्दवाडी येथील श्रीम, आशा प्रदीप पोवार (वय -५४) लस घेण्यास जात असताना ते वाहून गेल्या.

Also Read: रत्नागिरी तालुक्यात नियोजन; चार गावांत दररोज सरसकट चाचण्या

तालुका लांजा

मौजे विसावली -बेलेवाडी येथील सुरेश रघुनाथ हातीसकर व जानकू जानू हातीसकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. आंजणारी पुलाखालून पाणी वाहत असल्याने वाहतूुकीसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. भांबेड येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेताचे मोठया प्रमाणावर नुकसान. वाटूळ ते दाभोळ रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद, मौजे खोरनिनको येथील २ वाड्या जोडणारा लोखंडी साकवाखाली पाणी वाहत असल्यायने साकवावरील वाहतूक व ये-जा बंद करण्यात आली आहे.

Also Read: Kokan Rain Update – रत्नागिरी, सिंधुदुर्गला 2 दिवसांचा रेड अलर्ट

विलवडे येथील श्री. अकबर मलीन यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अंशतः नुकसान झाले आहे. काजरघाटीच्या रस्त्यावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद. विलवडे वाकड पूल पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद. पाचल येथील तळवडेमध्ये पाणी शिरल्याने अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. गणेशवाडी रायपाटण रोडवर पाणी असल्याने वाहतुकीस रस्ता बंद करण्यात आला आहे. . राजापूर शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे मदत कार्य सुरु आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here