रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झाले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चिपुळणातील या परिस्थितीचे छायाचित्र टिपलेत ‘सकाळ’चे प्रतिनिधी मुझफ्फर खान यांनी…

चिपळूण शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात तब्बल 13 फूट पाणी असून एसटी बसेस पाण्यात गेल्या आहेत.
चिपळूण शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.
खेर्डी मॉल कडे जाणारा रस्ता पाण्यात गेला आहे.
खेड परिसरातील सर्व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
बहादूर शेख नाका येथील जलमय झालेला परिसर
चिपळूण शहरातील देसाई मळा परिसर पाण्याखाली गेला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here