अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. राज कुंद्राने टेलिशॉपिंगपासून क्रीडा क्षेत्रापर्यंत विविध व्यवसायात गुंतवणूक केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या इतर व्यवसायांविषयी..

पश्मीना शालचा व्यवसाय, मौल्यवान धातू, बांधकाम आणि ऊर्जा प्रकल्प या सर्व क्षेत्रांमधील व्यवसायातून राजने पैसा, प्रसिद्धी मिळवली आहे. क्रीडा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातही त्याने व्यवसाय केला.
एमएमए फाइटिंग लीग आणि पोकर गेम लीग सुरू करण्यात राजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
BusinessToday.in च्या रिपोर्टनुसार राज याने टेलिशॉपिंग चॅनेल बेस्ट डील टीव्हीमध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
राजने जल्दी लाइव्ह स्ट्रीम अॅप देखील लॉंंच केले होते.
2009 मध्ये पत्नी शिल्पा शेट्टीसह राजने इंडियन प्रीमियर लीग टीम राजस्थान रॉयल्सच्या १२ टक्के भागीदारीसाठी गुंतवणूक केली.
राज कुंद्राने 2015 साली बेस्ट डील टीव्हीवरील 24×7 होम शॉपिंग चॅनल देखील सुरू केले होते. अभिनेता अक्षय कुमारने या चॅनलचे काही स्टॉक खरेदी केले होते.
अनेक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या राज हा पत्नी शिल्पासोबत अनेक संस्थांसाठी काम करतो. त्याने 2013 साली त्याचे ‘पैसे कसे कमवायचे नाहीत’ (How not to make money) नावाचे पुस्तक प्रदर्शित केले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here