औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोलसह इतर जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. येथील किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीवरील सुप्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला आहे.

बोरी(जि.परभणी) : नागापूर (ता.जिंतुर) येथील करपरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक गुरुवारी सकाळपासून बंद आहे.बोरी बसथांबा परीसरात दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान,अति पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात ८४ टक्के जिवंत जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गुरूवारी ( ता.२२ ) रोजी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आल्या असून दूधना नदीपात्रात बारा हजार ४९२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून संततधार पाऊस, मागील चोवीस तासात ४२.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली : या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने पाच ते सहा गावचा संपर्क तुटला आहे.
नांदेड : किनवट जवळच्या खरबीमार्गे विदर्भात जाणाऱ्या रस्त्यावरील पैनगंगा नदीच्या पुलापर्यंत पाणी आले आहे.
विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा पुलाजवळून नदीचे पाणी वाहत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here