अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर (sonam kapoor) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी सोनम लंडनहून मुंबईला आली. विमानतळावर सोनमला घ्यायला अनिल कपूर (Anil Kapoor) आले होते. यावेळी सोनमचे मुंबई विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या फोटोंमुळे सोशल मीडियावर ती प्रेग्नंट अल्याची चर्चा सुरू झाली. आता सोनमने एक हटके पोस्ट शेअर करून या चर्चेला पूर्णविराम दिला. (actress sonam kapoor tell about pregnancy rumours share video)

सोनमने सोशल मीडियावर एक बुमरॅंग व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून सोनमने लिहीले, ‘माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि आल्याची चहा.’ सोनमने या पोस्टमधून ती प्रेग्नंट नसल्याचे सर्वांना सांगितले आहे. सोशल मीडियावरील अफवांवर सोनमची ही उत्तर देण्याची हटके पद्धत नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली.

sonam kapoor

Also Read: ..अन् ‘ती’ डायरी वाचल्यानंतर आईने प्राजक्ताला बेदम चोपलं

सोनमने 2018 साली अनंद अहूजासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सोनम लंडनला गेली. लंडनमधील मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो सोनम सोशल मीडिवर शेअर करत होती. सोनमचा ‘ब्लाइंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटामध्ये पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. वीरे दी वेडिंग, नीरजा, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमधील सोनमच्या अभिनयाला प्रेभकांची पसंती मिळाली.

Also Read: Toofan Review; ‘तुफान’ एक छोटीशी वावटळ!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here