नागपूर : आपण सतत ‘ऑस्टियोपोरोसिस’ म्हणजे हाडांचा ठिसूळपणा हे नाव ऐकत असतो. घरात वृद्ध व्यक्ती असली की हा शब्द अधिक कानावर पडतो. सायलेंट डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा आजार शांतपणे हाडांचा क्षय करतो व हाडे फ्रॅक्चर होतात. याेग्य वेळी प्रतिबंध व उपचार केला नाही तर हा आजार व्यक्तीला मृत्यूच्या दरीत नेतो. पूर्वी वृद्धापत्कालीन दुखणे म्हणून दुर्लक्षित हा आजार अलीकडे तिसाव्या वर्षीच अनेकांमध्ये दिसते. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. काही अन्नघटक ऑस्टिओपोरोससला कारणीभूत ठरतात. म्हणूनच या घटकांचे आहारातले प्रमाण कमी करायला हवे. (Bone-fragility-Osteoporosis-Proper-diet-Health-Fitness-News–nad86)

मद्यपानामुळेही हाडं ठिसूळ होऊ शकतात. अल्कोहोलचा हाडांवर परिणाम होतो आणि ती कमकुवत होतात. त्यामुळे मद्यपानही कमी प्रमाणात करायला हवे.
कार्बनयुक्त पेय आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यातही या पेयांच्या सेवनामुळे हाडं ठिसूळ होण्याची शक्यता वाढते.
चहा, कॉफीचे अतिसेवनही हाडांसाठी हानिकारक ठरते. कॅफेनमुळे हाडं ठिसूळ होऊ शकतात. चहा, कॉफीशिवाय इतर काही पदार्थांमध्येही कॅफेनं असू शकतं. त्यामुळे कॅफेनचे प्रमाण कमी करा.
मिठाच्या अतीसेवनामुळेही हाडे ठिसूळ होऊ शकतात. मिठामुळे शरीरातल्या कॅल्शिअमवर परिणाम होतो. शरीरातलं कॅल्शिअम कमी होऊ शकते. कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास हाडांचे दुखणे मागे लागू शकते.
सोडा किंवा कार्बनयुक्त पेयांच्या नियमित सेवनामुळे हाडांची घनता कमी होते. त्यामुळे अशी पेयं टाळायला हवी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here