पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरले.
आज (ता. 22) जुलै सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2466 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे.
हे दृश्य पाहण्यासाठी संचारबंदी असताना धरणामागील खडकवासला-एनडीए रस्त्यावर असलेल्या मुठा नदीपात्रातील पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने आज पाणी सोडण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली होती.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here