रत्नागिरी : चिपळूण ( Chiplun)तालुक्यात पावसाने अक्षरक्षः हाहाकार उडाला आहे. पुरामुळे येथील पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली असून सकाळी तब्बल अकरा फूट पाणी होते. दुकाने बुडाली असून अपार्टमेंटचे तळमजले पाण्यात गेली आहेत. पूर्ण इमारतींमधील रहिवासी घरात अडकल्याने भितीचे वातावरण आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. नागरीकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.आज दिवसभरात घडलेल्या घटनांचे हे छायाचित्रणांसह हे अपडेट .(chiplun-khed-heavy-rain-flood-update-konkan-news-akb84)

एनडीआरएफची टीम


सुटका करताना पोलिस कर्मचारी


काढताना स्थानिक नागरिक

दिवसभराचे अपडेट
* कोळकेवाडी धरणक्षेत्र व वाशिष्ठी नदी पाणलोट क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्राबाहेर गेल्या 24 तासात 200 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला
* कोळकेवाडी धरणाच्या चार दरवाजांमधून 1 हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहेत.
* हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू आहे. बचाव कार्यासाठी सद्यस्थितीत खाजगी-6, कस्टम-1, पोलिस-1, पालिका-02, तहसिल कार्यालय-05 बोटी मदत करीत आहेत.
* एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूणमध्ये दाखल
* एनडीआरएफचे 04 बोटींसह 23 जणांचे पथक पुण्यावरुन खेड तालुक्याकडे दाखल
* रस्ता अनुकूल नसल्याने त्यांना उशिर होत आहे.
* रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे दाखल
* राजू काकडे हेल्प फाऊंडेशनचे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे.
* जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथक बचावकार्यासाठी पोहोचत आहे.
* आत्तापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या 100 नागरिकांची सुटका केली.
* सुटका झालेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
* निवारा व्यवस्थेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीद्वारे अन्नपुरवठा, पिण्याचे पाणी तसेच 500 बेडसीट्सचा पुरवठा करण्यात आला आहे.
* नौदल विभागाला विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचणार आहे.
* हवाई दलाची दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार
* चिपळूणच्या आजूबाजूची 07 गावे पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु
* सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही.
* परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
* खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
* सध्या ओहोटी असल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याने बचाव कार्यास मदत होत आहे.
* पुढील भरती साधारण रात्री 11 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
* पूरपरिस्थितीतून सुटका करण्यात आलेल्या नागरिकांकरीता अन्न, निवारा तसेच औषधे व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
* कोकण विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
* ट्रकद्वारे रत्नागिरीहून 2, दापोलीहून 2, गुहागरवरुन 2 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.
Esakal