यात एका कोरोना बाधित रुग्णासह प्रौढा चा समावेश आहे.

रत्नागिरी: घटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यामुळे काजळी नदीचा रुद्रावतार थांबता थांबेना. जवळपास 30 तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले नव्हते. उलट पाणी वाढल्यामुळे चांदेराईतील 15 घरातील साहित्य मध्यरात्री सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी कसरत करावी लागली. यात एका कोरोना बाधित रुग्णासह प्रौढा चा समावेश आहे.

Also Read: Konkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर

रत्नागिरी तालुक्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरीही साखरपा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी हाईटाईड झाल्यामुळे बुधवारी रात्री काजळी नदीला आलेला पूर तीस तास झाले तरीही अजून ओसरलेला नाही. गुरुवारी मध्यरात्री चांदेराई बाजारात पाण्याची पातळी वाढल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. बाजारपेठेतील शंभरहून अधिक दुकान अजूनही पाण्यातच आहेत. त्यात काल आणखी 15 घरांची भर पडली. पाणी वाढू लागल्यावर रात्री जागणाऱ्या ग्रामस्थांनी घरातील साहित्य रात्री एक वाजताच काढले, त्यावेळी पाण्याचा जोर वाढत गेला. त्यांच्या मदतीला अन्य ग्रामस्थ ही होते.

Also Read: Konkan Rain – रत्नागिरी जलमय; पुराचे पाणी रस्त्यावर

टीव्ही, फ्रिज सह भांडी सुद्धा उचलावी लागली. या परिसरात असलेली गणपती कारखान्यातील मुर्ती ही सुरक्षित ठिकाणी हलवाव्या लागल्या. चांदेराई याठिकाणी एक वयोवृद्ध आणि होम आयसोलेश असलेला कोरोना बाधितला सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी लागली. या गोंधळात ग्रामस्थांनी दोन रात्री जागून काढल्या. चांदेराई बरोबर हरचेरी परिसरातील 25 घरात पाणी शिरलं होते. तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

Also Read: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

काजळी नदीतील गाळ हाच पूर परिस्थितीला कारणीभूत असल्याचे मत माजी सरपंच दादा दळी यांनी व्यक्त केलं. नदी पात्रातील गाळ काढला तर प्रश्न सुटेल असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान काजळी किनारी असलेल्या तोणदे, टेंबे, पोमेंडी, सोमेश्वर या परिसरात पुराचे पाणी स्थिर होते. अनेकांनी रात्र जागून काढली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here