कऱ्हाड (सातारा) : तांबवे गावाला (Heavy Rain In Tambave Village) पुराचा वेढा पडल्यामुळे गाव संपर्कहीन झाले होते. तांबवे गावचा पूल गुरुवारी रात्री पाण्याखाली गेला. त्यापूर्वी तांबवे किरपे रस्त्यावरील व तांबवे डेळेवाडी रस्त्यावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे तांबवे गावचा रात्री संपर्क तुटला होता. पुराचे पाणी गावात आल्यामुळे बाजारपेठेत असलेल्या दुकानदारांची दैना उडाली. व्यापाऱ्यांनी रात्रभर साहित्य हलवण्यासाठी धावपळ केली. दरम्यान, महापुराच्या धास्तीने तांबवेकरांनी रात्र जागून काढली. (Rain Update Today Rainwater Siege Of Tambave Village bam92)
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कृष्णा-कोयना नद्यांसह उपनद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कृष्णा-कोयना नद्यांसह (Koyna and Krishna River) उपनद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक पूल, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. तांबवे गावाचा गुरुवारी रात्री संपर्क तुटला. गावाजवळील कोयना नदीवरील नवीन पूल गुरुवारी रात्री पाण्याखाली गेला. त्यापूर्वी किरपे- तांबवे रस्त्यावरील व तांबवे- डेळेवाडी रस्त्यावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे गाव सध्या संपर्कही झाले होते. पुराचे पाणी बाजारपेठेतून गावात शिरते. काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत पाणी येऊ लागल्यामुळे व्यापाऱ्यांनी 2019 सालच्या महापुरात झालेल्या नुकसानीचा विचार करून तातडीने दुकानातील साहित्य हलविण्यास सुरुवात केली.
Also Read: महाबळेश्वरात ‘वेण्णा’ ओव्हरफ्लो; कसणीत तीन तास वाहतूक ठप्प

रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. गावातील युवकांनी संबंधित व्यापारी व संस्थांना साहित्य हलवण्यासाठी मदत केली. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे ज्या लोकांची घरे बाधित होतात त्यांना मात्र पुराच्या धास्तीने रात्र जागून काढावी लागली. गावातील बहुतांश जणांनी पुराच्या धास्तीने रात्र जागून काढली. पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने गावातील बाधीत कुटुंबांचे दक्षिण तांबवे येथील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांबवे पुलावरील पाणी कमी झाले, मात्र पाण्याबरोबर आलेल्या लाकडामुळे पुलाच्या पूर्वेकडील अँगल तुटून पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, गावातील दळणवळण सध्यातरी बंदच आहे.
Rain Update Today Rainwater Siege Of Tambave Village bam92
Esakal