कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाडाला पुराचा (Heavy Rain In Karad) विळखा आवळू लागला आहे. शहरातील दत्त चौक, पाटण काॅलनी, पायऱ्या खालील भाग, कृ्ष्णा घाट, कुंभार पाणंद, जोशी बोळ येथील नागरीवस्तीत पाणी शिरल्याने १५० कुटुंबांना पालिकेने सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांना पालिका शाळा, मंगल कार्यालय, शाळांच्या खोल्यात जागा दिली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने कोयना व कृष्णा नद्यांच्या (Koyna and Krishna River) पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना व कृष्णा नदीच्या पाण्याची इशारा पातळी ४५ फुटांची आहे. ती इशारा पातळी पाण्याने ओलांडली असून कोयनेची पाण्याची पातळी आता ४७ फूट आहे. (Rain Update Today Heavy Rain In Karad Taluka)

कऱ्हाड शहराला पाण्याच्या विळख्याचा वेग वाढत असल्याने पालिकेने मध्यरात्री शहरातील १५० हून अधिक कुटुंब सुरक्षित स्थळी हलवली आहे.

शहराला पाण्याच्या विळख्याचा वेग वाढत असल्याने पालिकेने मध्यरात्री शहरातील १५० हून अधिक कुटुंब सुरक्षित स्थळी हलवली आहे. पाटण काॅलनी, जोशी बोळ, दत्त चौक, कुंभार पाणंद, पत्रा चाळीतील नागरिकांना हलवण्यात आले. शाळा क्रमांक अकरा, दोन, चार येथे तर मंगल कार्यालयातही त्यांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक नदीकाठावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तैनात केली आहेत. दर तासाला वाढणाऱ्या पाण्याचा ते अहवाल देत आहे. नदीकाठावर पोलिसही तैनात आहेत.

Koyna Dam

मोरगिरी : पावसाच्या अतिवृष्टीमुळे किल्ले मोरगिरी (Morgiri Fort) गावा शेजारील डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात शेतीचे मोठे नुकसान झाली आहे. गावाच्या लगत असलेले महादेवाचे मंदिर दरडीखाली गाडले गेले. गुणवंत गडाला (Gunvant fort in Morgiri) लागून असलेला डोंगराचा भाग कोसळला आहे. दरडी कोसळण्याचे प्रमाण अजून चालूच आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी गावकरी घरे सोडून नातेवाईकांकडे रहायला गेली आहेत. पावसाचे प्रमाण वाढत आहे. गुणवंतगडाला लागलेला डोंगराचा भाग कोसळत आहेच, पण डोंगरावरचे पाणी दगड माती गावात आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. लोक आपली घरे सोडून जात आहेत.

Rain Update Today Heavy Rain In Karad Taluka

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here