तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी (ता.२३) गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली. यासाठी देवीचे मुख्य भोपे पुजारी संभाजीराव पाटील, शिवराज पाटील आणि प्रशांत पाटील यांनी पुढाकार घेतला.

गुरुपौर्णिमेनिमित्त विविध जातींची फुले पुणे येथून आणून सजावट करण्यात आली.
गुलछडी आणि अष्टर ही फुले, तर आरकेट आणि अॅथेरियम यांच्या पेंड्या आणण्यात आल्या.
कारनेशियम १०० पेंड्या, डच गुलाबाच्या २५० पेंड्या, जेरबरा ३५० पेंड्या, निळी शेवंतीचाही वापर करण्यात आला.
सुमारे तीन तासांचा कालावधी फुलांची आरास करण्यास लागला, असल्याचे प्रशांत कदम यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here