जळगाव ः सर्वांनी रेल्वेचा अनेक प्रवास नक्की केला असला तरी रेल्वेच्या खऱ्या प्रवासाचा आनंद हा टाॅय ट्रेन (Toy train) मधून मिळतो. उंच पर्वत रांगा, या रांगामधून जाणारी रेल्वे, बोगदे, उंच पुल, हिरवेगार दृष्य असे निर्सग संपन्न प्रवास तसाच थरारक प्रवास या भारतातील (India) टाॅय ट्रेन मधून आपणास मिळेले. चला तर जाणून घेवू अशा ट्रेन बद्दल..
(this is amazing famous toy train in india )

कालका-शिमला टॉय ट्रेन
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीतील कालका-शिमला ही भारतातील ही प्रसिध्द प्रवास आहे. हिरव्यागार टेकड्यांमधून जाणारा हा प्रवास सौंदर्याचे विहंगम दृश्य आपणास देतो. कालका-शिमला 96 km कि.मी. मार्ग हा एक अरुंद रेल्वे मार्ग आहे. ज्यामध्ये १०3 बोगदे आणि 850 पेक्षा जास्त पूल आहेत. कालका-शिमला टॉय ट्रेनमधील सुमारे साडेपाच तासांचा प्रवास तुमच्यासाठी एक अतिशय संस्मरणीय अनुभव घेऊन येतो.

कांग्रा व्हॅली
पठाणकोट ते जोगिंदरनगर दरम्यान कांग्रा व्हॅली ही रेल्वे अरुंद गेजवर धावणारी रेल्वे आहे. भारतातील आणखी एक हेरिटेज टॉय ट्रेन ही असून ही ट्रेन युनेस्को वर्ल्ड साइट असून ती पालमपूरच्या पूल व चहाच्या बागेतून धावते. धौलाधार परिसराचे भव्य दृश्य या रेल्वेतून दिसते. ज्वालामुखी रोड, कांग्रा, नगरोटा, पालमपूर, बैजनाथ आणि जोगिंदरनगर मार्गावर पठाणकोट जंक्शनमार्गे ही धावते.

दार्जिलींग हिमालय ट्रेन
दार्जिलींग हिमालय टॉय रेल्वेतून प्रवास केल्यास उंच बर्फाने झाकलेले पर्वत, थरारक ढगांमुळे आपला प्रवास अत्यंत रोमांचकारी होईल. कांचनजंगा पीक आणि दार्जिलिंग शहराचे अविश्वसनीय दृश्य पाहण्यास मिळेल. युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हे भारतातील सर्वोत्तम हेरिटेज टॉय ट्रेन आहे. या टॉय ट्रेनमध्ये तुम्हाला दार्जिलिंगमधून फिरण्याची आणि नंतर दार्जिलिंगच्या मार्गाचा आनंद घेण्याची संधी मिळेल.

नीलगीरी माउंटन टाॅय ट्रेन
तामिळनाडू मधील नीलगिरी माउंटन टॉय ट्रेनमध्ये केवळ भारतातच नाही तर आशियातील प्रसिध्य ट्रेन आहे. घनदाट जंगले, खडकाळ प्रदेश आणि धुकेदार डोंगराळ प्रदेशातून ही ट्रेन जाते. नीलगिरी माउंटन टाॅय ट्रेन ही भारतातील सर्वात विस्मयकारक ट्रेन पैकी एक आहे. याव्यतिरिक्त, भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे. मेट्टुपलायममार्गे केटी आणि ऊटीमार्गे कल्लार, डर्ले, कुन्नूर, वेलिंग्टन मार्गे जाते.
Esakal