पसरणी (सातारा) : वाई तालुक्याच्या (Wai Taluka) पश्चिम भागात देवरूखवाडी- कोंढावळे येथे मुसळधार पावसामुळे (Heavy Rain In Satara) डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मायलेकींचा दुर्दैवी अंत झाला, तर दोघे जण जखमी झाले. या दुर्घटनेत तीन म्हशी व चार रेडकेही ढिगाऱ्याखाली गाडली जाऊन मृत्युमुखी पडली. (Mother and Daughter Death In Landslide At Devrukhwadi Kondhavale Village bam92)

बुधवारपासून वाई तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जांभळी व जोर खोऱ्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे.

काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे देवरूखवाडी येथील घरांवर डोंगरकड्याचा भाग कोसळून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली ८ ते १० घरे गाडली गेली. यातील एका घरात अडकून राहीबाई मारुती कोंढाळकर (वय ८०) व त्यांची मुलगी भीमाबाई सखाराम वाशिवले (वय ६२) या मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे जखमी झाले असून, आनंदा गुणाजी कोंढाळकर यांची म्हैस व रेडकू, तर भगवान हरिबा कोंढाळकर यांच्या दोन म्हशी व तीन रेडके या घटनेत जागीच मृत झाली.

Also Read: Satara Landslide : साताऱ्यात मृत्यूतांडव; भूस्खलनात 10 जणांचा बळी

बुधवारपासून वाई तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जांभळी व जोर खोऱ्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. धो- धो कोसळणाऱ्या पावसामुळे जांभळी खोऱ्यातील कमळगडाच्या पायथ्याशी असलेल्या देवरुखवाडी या १७-१८ घरांच्या वाडीवर काळाने घाला घातला. सायंकाळच्या सुमारास कडा कोसळतोय, असे लक्षात येताच काहींनी हाका मारून आरडाओरडा करून लोकांना घराबाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, वयस्कर असलेल्या राहीबाई व त्यांची मुलगी भीमाबाई दरवाजाला आतून कडी लावून घरात बसल्याने त्यांना हाका ऐकू गेल्या नसाव्यात. त्यामुळे घरातच अडकून राहिल्याने त्यांचा जीव वाचवता आला नाही. २५ जण या घटनेत घराबाहेर पडल्याने बचावले. आकस्मिक घडलेल्या या आपत्तीत गोठ्यातील जनावरांना वाचविणेही शक्य झाले नाही. त्यामुळे सहा जनावरे मृत्युमुखी पडली. ही दुर्घटना सायंकाळच्या सुमारास घडली असल्याने मोठी जीवितहानी टळली.

Landslide Wai Taluka

या घटनेची माहिती कळताच आमदार मकरंद पाटील यांनी रात्री ९ वाजताच तहसीलदार, पोलिस पथक, गटविकास अधिकारी यांच्यासह तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बचाव, तसेच मदत कार्यास सुरुवात केली; पण जोरदार पाऊस, खंडित झालेला वीजपुरवठा व अंधार यामुळे त्यांना मदतकार्य थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. आमदार पाटील आणि प्रशासनाने रात्रीच घरातील व्यक्तींना प्राथमिक शाळा इमारतीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली होती. त्या ठिकाणी ग्रामस्थांना हलविण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास आमदार पाटील पुन्हा घटनास्थळी पोचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राहीबाई व भीमाबाई यांचे मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी वाई येथे पाठविण्यात आले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने मातीचे ढिगारे हटविण्याचे काम करण्याबरोबरच गावात पिण्याचे पाणी व वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर त्यांनी शेजारील किरोंडे, जांभळी आदी अतिवृष्टीग्रस्त गावांतील नुकसानीची पाहणी केली. धुवाधार पावसाने भातशेती बांध-बंदिस्ती, शेताच्या ताली, रस्ते, पूल यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ओढे नाल्यांनी आपले प्रवाह बदलले आहेत. दरम्यान, मृत राहीबाई व भीमाबाई यांच्या मृतदेहांचे वाई येथे शवविच्छेदन करून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

MLA Makarand Patil

आमदारांच्या मदतीसाठी सूचना

देवरूखवाडी हे गाव कमळगडाच्या पायथ्याजवळ उतारावर वसले आहे. या भागात मोबाईल नेटवर्क अभावाने मिळते. मात्र गुरुवारी रात्री दुर्घटनेबाबत कळताच आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना घटनास्थळी पोचण्याच्या सूचना दिल्या. स्वतःही दुर्घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे यांनीही स्वतः चिखलात उतरून अडकलेले ग्रामस्थ, त्यांच्या संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्यासाठी मदत केली. आमदार पाटील यांनी बेघर झालेल्या नागरिकांची निवास व्यवस्था, कपडे, अंथरूण-पांघरूण, वीजपुरवठा, जेवण या सुविधांसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून सूचना केल्या.

Mother and Daughter Death In Landslide At Devrukhwadi Kondhavale Village bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here