झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा चाहता वर्ग मोठा आहे. याशोमधील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या कालकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच या शोमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने एंट्री केली.

झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या ‘झी कॉमेडी फॅक्टरी’ या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खानने ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये हजेरी लावली.
फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’ च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला.
‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांचे जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्वांना हसू अनावर झालं.
फराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आली आणि या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही.’
पुढे फराह म्हणाली, ‘मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं.” असं म्हणून मंचावरील सर्व विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here