राजापूर (रत्नागिरी) : नाणार प्रकल्पाच्या विरोधाचे वातावरण असून, समर्थकांची संख्या कमी आहे. प्रकल्पाला जमीन देण्यास लोकांचा विरोध आहे. या साऱ्या चर्चा खोडून काढण्यासाठी प्रकल्प समर्थकांनी जमीन मालकांची संमतीपत्रेच साऱ्यांसमोर सादर करीत कोण म्हणतो जमीन देत नाही आणि प्रकल्पाला विरोध आहे, असा सवाल आज केला. नाणार विरोधकांच्या दाव्याला परस्पर चपराक मिळाली.
नाणारवरून गेल्या काही दिवसांपासून रणकंदन माजलेले असताना रिफायनरी समर्थकांनी डोंगरतिठा येथे प्रकल्पाच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने गोळा झालेल्या समर्थकांनी ‘नाणार झालाच पाहिजे’ या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी जमीन मालकांनी प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठीच्या संमतीपत्रांचे सादरीकरण करत प्रकल्प समर्थकांनी ‘कोण म्हणतो प्रकल्पाला विरोध आहे आणि जमीनमालक जमिनी देत नाहीत’ असा सवाल केला.
हेही वाचा – सांगलीत तरुणाचा खून
‘नाणार झालाच पाहिजे’ घोषणांनी परिसर दणाणला
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेमध्ये पडलेल्या दुफळीवरून गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्याचे वातावरण तापले आहे. नाणारवरून शिवसेनेतील वातावरण ढवळून गेले आहे. नाणार रिफायनरी समर्थकांनी डोंगरतिठा येथे शक्तिप्रदर्शन केले. समर्थकांनी नाणार झालाच पाहिजे, अशी प्रकल्प समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, अविनाश महाजन, सागवेच्या जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास अवसरे, जिल्हा परिषेदेच माजी बांधकाम सभापती अजित नारकर, नगरसेविका प्रतीक्षा खडपे, भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, राष्ट्रवादीचे संतोष सातोसे, माजी नगरसेवक सुहास तावडे, भाई देसाई, महेश आग्रे, विलास कुळकर्णी, प्रल्हाद तावडे, राजा काजवे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्प समर्थक उपस्थित होते.
फलकांनी वेधले लक्ष
प्रकल्पाच्या पूर्वीच्या आराखड्यातील काही गावे वगळून नवीन आराखडा तयार केला आहे. या नव्या आराखड्याला पूर्वीचे नाव न देता ‘छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी’ असे नामकरण करावे, अशी मागणी या वेळी प्रकल्प समर्थकांकडून केली गेली. त्याबाबत समर्थकांनी फडकविलेल्या फलकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

News Story Feeds