पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात गेल्या तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गढुळपणा वाढला आहे. महापालिकेकडून पाण्याची शुद्धीकरण करण्यात येत असून, तरी नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाळ्यात ज्या प्रमाणे अन्नाची स्वच्छता पाहिजे. तसेच पाण्याचीही हवी. इतर ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आढळते आणि आजारांना निमंत्रण मिळते. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी निर्जंतूक आणि स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. शिशीर जोशी सांगतात. पावसाळा, पुराचे पाणी आणि भोवतालचे वातावरण पाहता नागरिकांनी बाहेरचे दूषित अन्न आणि पाणी खाने टाळावे, तसेच डासांच्या दृष्टीनेही काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पाणी दूषित होण्याचे दोन प्रकार

१) भौतिकदृष्ट्या : पाण्यामध्ये कचरा, माती, गाळ आदी मिसळते. पाणी गाळून आणि तुरटी फिरवून ते शुद्ध होते.

२) रासायनिकदृष्ट्या : जीव-जंतूंनी हे पाणी दूषित होते. हा अतिशय धोकादायक प्रकार असून, यामध्ये पाणी उकळून घेणे जास्त सोईस्कर आहे.

Also Read: लोणावळ्यात पावसाचा जोर कायम, दोन दिवसात विक्रमी पाऊस

stomach pain

दूषित पाण्यामुळे होणारे आजार..

  • अतिसार, जुलाब, उलट्या

  • अतिसार, सर्दी, खोकला किंवा श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी

काय काळजी घ्याल…

  • श्वसनासंबंधी तक्रारी वाढत असतील तर पाणी सूंठ घालून उकळावे

  • पोटाशी निगडित त्रास वारंवार होत असेल तर मीठ व साखर घातलेले पाणी प्यावे. स्वयंपाकासाठी पण उकळलेल्या पाण्याचा वापर करावा

Also Read: खडकवासलातून पाणी सोडल्यानंतर केव्हा वाढतो धोका?

”पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार सामान्यतः आढळता. तसेच डासांमुळेही विविध साथीचे आजारही याच काळात वाढतात. नागरिकांनी अशा वेळी स्वच्छ आणि निर्जंतूक पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. ”

– डॉ. शिशीर जोशी, जनरल फिजिशियन, सह्याद्री रूग्णालय

”महापालिकेच्या माध्यमातून बंद नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. तरीही गढूळ पाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी नागरिकांनी पावसाळी आजार टाळण्यासाठी उकळलेल्या आणि गाळलेल्या पाण्याचा वापर करावा. ”

– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, मनपाEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here