अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळीये गावावर शोककळा पसरली आहे. या गावात गुरुवारी दरड कोसळली आणि या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली.
अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हेदेखील उपस्थित होते.
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. जखमींवरील उपचारखर्चही सरकारतर्फे करण्याचे त्यांनी जाहीर केले.
परिस्थिती चिंताजनक असून पुढील काही दिवसही धोक्याचे आहेत. त्यामुळे डोंगरउताराजवळील गावे आणि नदीकाळच्या गावांतील लोकांच्या स्थलांतराला प्राधान्य देण्यात येत असून लोकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here