जळगाव ः शहरात लसीकरणाचा (Vaccination) वेग मंदावला आहे. काही केंद्रे (Center) तर लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद राहतात. मात्र आज शहरातील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) लस येणार असल्याचे कळताच शहरातील सिंधी कॉलनीत असलेल्या चेतनदास मेहता रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी पहाटे पाच पासून गर्दी केली होती. आपला क्रमांक पहिला लागला पाहिजे यामुळे सकाळी नऊपर्यंत केंद्रावर तोबा गर्दी झाली. गर्दी झाल्याने आपल्या क्रमांकांवर नागरिकांनी गोंधळ (Citizens argue) घालण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने पोलिसांना (Police) यावेळी पाचारण केल्यानंतर गोंधळ थांबला.
(jalgaon vaccination center citizens large crowd vaccine shortage)

Also Read: जळगाव जिल्ह्यात १४ लाखावंर कोरोनाच्या चाचण्या

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेव अस्त्र म्हणजे कोरेाना लसीकरण करून घेणे होय. याची जाणीव नागरिकांना झाल्याने नागरिक वाट्टेल त्या ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करताहेत. मात्र लसीकरण केंद्रावर लसींचा साठा कमी उपलब्ध होत असल्याने काही केंद्रे लवकर बंद होत आहे. तर काही केंद्रे सुरूच होत नाही.

Also Read: श्री विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून मुक्ताई पालखी माघारी

अशात लस आल्याचे कळताच त्या केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. आज शहरातील सिंधी कॉलनीत असलेल्या चेतनदास मेहता रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस येणार असल्याचे समजताच सिंधी कॉलनीसह, जोशी कॉलनी, कंजरवाडा, तांबापूरा परिसरातील नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. गर्दी एवढी वाढली की केंद्रावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांना बोलावावे लागले. पोलिस आल्यानंतर गोंधळ कमी झाला. मात्र गर्दी कायम होती. ज्याचा क्रमांक आला त्याला लस देण्यात आली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here