नकार (Rejection) हा वैयक्तिक आयुष्यात असो कि, व्यावसायिक अवघडच असतो. नकार मिळाल्यानंतर तुम्ही स्वत:वर आणि स्वत:च्या कौशल्यावर प्रश्न निर्माण करु लागता. नकार मिळताच तुम्ही स्वत:ला कमी लेखता आणि तुम्ही कोणालाही आवडत नाही असा विचार करु लागता. पण अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकार पर्सनली घेऊ नये हे लक्षात ठेवले पाहिजे.

लक्षात ठेवा, कधीही नकार मिळाल्यानंतर स्वत:वर, स्वत:च्या कौशल्यावर शंका घेऊ नका. वारंवार स्वत:ला सांगता राहा की, कोणताही नकार तुमची योग्यता ठरवू शकत नाही. नकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या भावना स्वीकारा
नकार मिळाल्यानंतर तुम्हाला जे काही वाटतयं, तुमच्या मनात जी कोणतीही भावना आहे ती स्विकारा. तुमच्या मनातील भावना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही तुमच्या भावना नाकारल्या तर तुम्ही आणखी दुःखी व्हाल. त्यामुळे तुमच्या भावना स्वीकारा.

निराश होऊ नका
एखद्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे जग संपत नाही हे वारंवार स्वत:ला सांगा. आयुष्यात चढ-उतार येत असातात. नकार ही एक फेज आहे जी काळानुसार आपल्या आयुष्यातून निघून जाईल. त्यामुळे निराश होऊ नका. नकारात्मक विचार करणे टाळा.

स्वतःला दोष देऊ नका
नकार मिळाल्यानंतर आपलीच काहीतरी चूक झालीये असे वाटत असेल तर अत्यंत चुकीचे आणि घातक ठरेल. तुम्ही चुकाला आहात अशी भावना मनात ठेवू नका.

स्वत:ला थोडा एकांत द्या
नकार मिळाल्यानंतर विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी स्वत:ला थोडा एकांत द्या. एकांतात थोडा शांत डोक्याने विचार करा आणि स्वतःला यातून बाहेर काढता येईल याचा विचार करा.
Esakal