रत्नागिरी : कोकणातील शिमग्याच्या पालखीला गावाला चाललेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा आणि सणाचा आनंदही द्विगुणीत व्हावा, म्हणून एक मोबाईल ॲप निर्माण केले आहे. ‘येताव’ असे त्याचे नाव आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.yetavtravel हे ॲन्ड्रॉइड मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ही अभिनव कल्पना राबवली आहे, आनंद तानाजी वामनसे- पावस, सुबोध अनंत मेस्त्री, चिपळूण रुपेश चौधरी, प्रसन्न हर्डीकर- सावर्डे या चौकडीने.
याबाबत माहिती देताना सुबोध अनंत मेस्त्री म्हणाले, फाल्गुन महिना म्हटला की, मुंबईकरांची कोकणात पालखीला जायची लगबग सुरु होते. नोकरी, धंद्यानिमित्त मुंबईत स्थिरावलेला कोकणी माणूस गावाला जायचे म्हणून उत्साहित होतो. गावची लाल माती आणि जवळची नाती गोती त्याला खुणावू लागतात. व्यावहारिक अडचणीमुळे मुंबईला आलेले म्हातारेकोतारे पुन्हा आपल्या मूळ गावी जायचे म्हणून आनंदी होतात.
हेही वाचा – म्हणुन… या तरुणीने दिला आपला पहिला पगार वृद्धाश्रमास… –
या ‘येताव’ मोबाईल ॲप करा डाऊनलोड
परंतु यात मुख्य अडचण असते, ती बस किंवा रेल्वेची तिकिटे मिळण्याची. त्यामुळे मनात असूनही अनेकांना पालखीला मुकावे लागते.कोकणात होळीनिमित्त प्रायव्हेट गाडीने जाणाऱ्या लोकांचे प्रमाणही बरेच आहे. कोण कधी चाललंय किंवा परत निघणार आहे? हे माहिती नसल्यामुळे अनेक गाड्या रिकाम्या जातात आणि रिकाम्या येतात. गावातील एका घरातील माणसे ट्रेनच्या गर्दीत पिचून नंतर चालत, रिक्षाने सामान ओढत येतात तर बाजूच्या घरातील माणसे स्वतःच्या गाडीने दोन-तीन सीट रिकाम्या ठेवून येतात. एकाच गावात किंवा गावाच्या आसपास जाणाऱ्या प्रायव्हेट गाड्यांबद्दल माहिती, म्हणजे कोण, कधी, कुठून, कुठे निघणार आहे? आणि त्या गाडीत किती सिटा रिकाम्या असणार आहेत? हे आधीच कळले तर हा प्रश्न चुटकीसर सुटू शकतो.
हेही वाचा – ८० व्या वर्षाच्या आजींने ओलांडली पुस्तकांची पन्नाशी…
ट्रॅफिकही होईल कमी
या ‘येताव’ मोबाईल ॲपचा वापर जर जास्तीत जास्त जणांनी कोकणात शिमगा-गणपतीसाठी जाण्यासाठी केला तर मुंबई-गोवा महामार्गावर सणाच्या दिवसांत होणारी भयंकर ट्रॅफिकदेखील काही प्रमाणात कमी होईल. रेल्वे आणि एसटीवरचा ताण कमी होऊन इंधन आणि पर्यावरणाचीही देखील बचत होईल, असे प्रसन्न हर्डीकर यानी सांगितले.
आम्ही चाललोय, तुम्ही येता काय?
कोकणातील ‘येताव’ या शब्दाचा अर्थच मुळी आम्ही चाललोय, तुम्ही येता काय? म्हणून प्रेमाने विचारणे आहे. तेव्हा या मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमच्या प्रवासाची माहिती आजचं टाकून
ठेवू शकता.
– आनंद तानाजी वामनसे
एकदा रिक्वेस्ट मान्य झाल्यास…
या ॲपमध्ये प्रायव्हेट गाडीच्या मालकाने कधी, कुठून, कुठे जाणार आहे? गाडी कोणती आहे? किती सीट रिकाम्या आहेत? ही माहिती टाकावी. त्यांनी दिलेली ही माहिती ॲपमध्ये त्या गावाच्या दिशेने जाऊ इच्छिणाऱ्या गावातील किंवा अगदी आसपासच्या गावातील प्रवाशांनाही दिसेल व ते ॲपनिर्देशित चार्जेस पाहून गाडीमालकाला रिक्वेस्ट पाठवू शकतील. एकदा रिक्वेस्ट मान्य झाल्यास चॅट किंवा कॉलद्वारे संवाद साधून ठरविलेल्या वेळी एकमेकांना भेटून प्रवास करू शकतील. येथे ॲपने ठरविलेले चार्जेस प्रवाशाने गाडीमालकाला द्यायचे आहेत.

News Story Feeds