मोरगिरी/पाटण (सातारा) : मुसळधार पावसाने (Heavy Rain in Patan Taluka) भूस्खलनात गाडलेल्या तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी (Landslide In Aambeghar) गावात मदत कार्यास स्थानिक स्वयंसेवकासह एनडीआरएफच्या (NDRF Team) पुढाकाराने काल (शनिवार) सकाळपासून सुरवात झाली. पथक येण्याअगोदर स्थानिक ग्रामस्थांनी सहा मृतदेह बाहेर काढले होते. पथकाच्या सहकाऱ्याने आणखी पाच मृतदेह सायंकाळअखेर बाहेर काढण्यात यश आले होते. पावसाने उघडीप दिल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या चार कुटुंबांतील १४ पैकी १२ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यात दोन लहान मुलीचाही समावेश होता. त्यांच्या नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचा हृदय पिळवटणारा होता. मदत कार्यात पावसानेही उसंत घेत साथ दिली होती. स्थानिक नागरिकांसह सातारा, कऱ्हाडहून गेलेल्या स्वयंसेवकांनीही एनडीआरएफला मदत कार्यात हातभार लावला. मृतांत एका लहान मुलाचा समावेश होता. बाहेर काढलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. त्याचबरोबर ‌बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. (Patan Taluka Landslide 21 People Death In Landslide At Mirgaon Dhokavale Ambeghar Village bam92)

दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजविला असतानाच भूस्खलनाच्या धोक्यात गाव वाहून गेले होते.

सापडलेल्या मृतदेहांपैकी काहींची ओळख पटली होती. लक्ष्मण कोळेकर, अनुसया कोळेकर, लक्ष्मी कोळेकर, विनोद कोळेकर, महेश कोळेकर अशी त्यांची नावे आहेत. आंबेघर (Aambeghar Landslide) येथे काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात १४ जण गाडले गेले. सकाळी मदतकार्याला सुरुवात झाली. एनडीआरएफसहित अनेकांनी त्यात हातभार लावला. एनडीआरएफ पथक पोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते. त्यांनी सहा, तर पथकाने पाच मृतदेह शोधले. अद्याप पाच मृतदेह गाडले गेल्याची भीती आहे, त्यांचा शोध सुरू आहे. गावात साचलेला राडारोडामुळे मदत कार्यात अडचण येत होती. गावात दोन किलोमीटर अलीकडून चालत जावे लागत होते. तेथील रस्ता तुटल्याने वाहन पुढे जात नव्हते. तहसीलदार योगेश्वर टोंपे व त्यांचेही सहकारी तेथे मदत कार्यात सहभागी होते. साडेबाराच्या सुमारास एनडीआरएफचे पथकही पोचले. दुपारी एक वाजेपर्यंत काही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर बेपत्ता असलेल्यांचा शोध मोहीम सुरू झाली.

Also Read: मी दिल्लीत असलो, तरी माझं लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडं

भूस्खलनाने जवळपास तीस फुटांचा राडारोडा हलविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर मृतदेह सापडण्यास सुरवात झाली. आंबेघरची स्थिती अत्यंत विदारक आहे. स्वयंसेवकांनी खोऱ्यांच्या मदतीने चिखल हलविला. आंबेघरकडे येणाऱ्या रस्त्यावरील नदीचे पाणी ओसरल्याने थेट वाट झाली. जिल्ह्यातील स्वयंसेवकही तेथे मदतीला दाखल झाले होते. सातारा, कऱ्हाडसह जिल्ह्याच्या अन्य भागांतूनही अनेक जण मदतीसाठी धावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गतीने मदतकार्य राबविण्याचे काम सुरू होते. गोकूळ गावाजवळ रस्ते तुटल्याने एनडीआरएफच्या पथकाने तेथून चालत आंबेघर गाठले. तत्पूर्वीच स्थानिकांनी मदत कार्याला सुरुवात केली होती. पावसाच्या उघडिपीसह पाणी ओसरल्याने शासकीय मदत तेथे पोचली होती. दुपारी दीडच्या सुमारास शासकीय अधिकारी पोचले. सामाजिक स्वयंसेवी संस्था, स्थानिक ग्रामस्थ त्याचबरोबर कऱ्हाडसहित पाटण, पुणे, सातारा येथील स्वयंसेवक मदतसाठी धावून आले. आंबेघरचा डोंगर पूर्ण कोसळल्याचे विदारक स्थिती सुन्न करणारी होती.

Also Read: Patan Landslide : मिरगाव, ढोकावळे, आंबेघरात दरड कोसळून 20 जणांचा बळी

Patan Taluka Landslide

आंबेघरच्या अलीकडे तीन किलोमीटरवर राडारोडा पसरला होता. चिखलाचा खच साचला होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा तेथे पोचली नाही. अतिवृष्टीने तुटलेले रस्ते यामुळे मदतकार्य वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजविला असतानाच भूस्खलनाचा धोक्यात गाव वाहून गेले होते. स्थानिक नागरिकांनी एकमेकाला मदत करत सहा कुटुंबांना जीवदान दिले होते. आज पुन्हा सकाळी त्याची पुनरावृत्ती झाली. बेपत्ता झालेल्या १४ जणांचा शोध सुरू झाला. पावसाने आज उसंत दिली व नद्यांचेही पाणी ओसरल्याने थोडासा दिलासा मिळाला. एनडीआरएफच्या पथकासहित जिल्ह्यातील विविध संस्थांचे स्वयंसेवकही आंबेघरला पोचले. तहसीलदार टोंपे पोचले आहेत. स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू झाले. त्या वेळी येणारे स्वयंसेवकही हातभार लावत होते. एनडीआरएफचे पथकही पोचल्याने मदत कार्यास गती मिळाली. मदतीने दुपारपर्यंत सहा, तर सायंकाळअखेर १२ मृतदेह शोधण्यास त्यांना यश आले.

Aambeghar Landslide

भूस्खलनात मृतदेह सापडल्यांची नावे

आंबेघर तर्फ मरळी येथे भूस्खलनात मृतदेह सापडल्यांची नावे अशी, लक्ष्मी वसंत कोळेकर, विनोद वसंत कोळेकर, सुनीता विनोद कोळेकर, मारुती वसंत कोळेकर, सुनील कोळेकर, अनुसया लक्ष्मण कोळेकर, उमा धोंडिबा शिंदे, मंदाताई रामचंद्र कोळेकर, रामचंद्र विठ्ठल कोळेकर, अन्य दोन लहान मुलांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, त्यांची ओळख पटू शकलेली नाही. यापैकी सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दिनकर कोळेकर व त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता आहेत. ते अद्यापही सापडलेले नाहीत. रात्री अंधारामुळे मदतकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा बेपत्ता लोकांचे शोधकार्य सुरू राहणार आहे.

NDRF Team

कोणी कोणाला सावरायचं

आंबेघर तर्फ मरळी येथील घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली. मुंबई पुण्यासह गावातील नातेवाइकांचा आक्रोश, मृतदेह शोधण्यासाठी चाललेली एनडीआरएफ जवान व परिसरातील युवकांची धडपड, सापडलेल्या मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन, घरांवर येऊन २० फुटांचा भराव, मरून पडलेली जनावरे अशी परिस्थिती पाहून मन हेलावून जात होते. पावसामुळे थांबविलेली शोध मोहीम आज सुरू झाली. तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या नेतृत्वाखाली गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक जण धडपडत होते. एकेक मृतदेह बाहेर येईल तसा त्यांचे नातेवाईक हंबरडा फोडत होते. कोणी कोणाचे सांत्वन करायचे असेच वातावरण साऱ्यांनाच सुन्न करून गेले.

एनडीआरएफचे पथक येथे पोचले आहे. त्यापूर्वीच येथे मदत कार्य सुरू झाले आहे. मात्र पथक आल्याने त्याला गती आली आहे. राडारोडा व मलमा हटवून सहा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्यापही पाच जण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे.

-योगेश्वर टोंपे, तहसीलदार, पाटण

Patan Taluka Landslide 21 People Death In Landslide At Mirgaon Dhokavale Ambeghar Village bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here