बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी करिअरच्या सुरूवातीला बरीच लोकप्रियता मिळवली पण नंतर मात्र ते इंडस्ट्रीतून गायब झाले. असाच एक कलाकार म्हणजे जुगल हंसराज. आज जुगलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

जुगल हसंराजने ‘मासूम’ या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.
२००० मध्ये ‘मोहब्ब्तें’ या चित्रपटामुळे जुगलने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली.
त्यानंतर त्याने ‘प्यार तुम्ही से कर बैठे’ या चित्रपटामध्ये काम केले पण हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला.
२०१४ मध्ये त्याने गर्लफ्रेंड जास्मिनशी ऑकलँडमध्ये लग्नगाठ बांधली.जास्मिन ही इन्वेस्टमेंट बँकर आहे.
सध्या जुगल करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊस या चित्रपट निर्मिती संस्थेमध्ये काम करतो.
‘कहानी २’ या विद्या बालनच्या चित्रपटामध्ये जुगलने खलनायकाची भूमिका साकारली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here