शिरोली पुलाची (कोल्हापूर) : सांगली फाटा येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय (Pune-Bangalore National Highway)महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाणी पातळी काल रात्री पासून दिड फुटाने कमी झालेली आहे. पाणी संथ गतीने कमी होत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक आद्याप बंद असून, महामार्ग सुरू झाल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.(Pune-Bangalore-National-Highway-closed-dont-believe-the-rumors-Appeal-police-administration-akb84)

शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे ; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले. पाणी संथ गतीने कमी होत आहे. पाणी आडवे मागे सरकले असले तरी महामार्गावरील पाण्याची उंची कायम आहे.
Also Read: पुणे – बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले

पाण्याला प्रचंड वेग आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी बोटीतून रस्त्याची पाहणी केली. पाण्याला वेग प्रचंड असून, पाण्याची पातळी आणखी तीन फूटाने कमी झाल्या नंतर, पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली जाईल, त्यानंतर अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्यता भोसले यांनी व्यक्त केली. म्हणजेच पावसाने उघडीप दिली आणि पाण्याची पातळी कमी झाली तरच सायंकाळ नंतर महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
Esakal