अनेक क्षेत्रांमध्ये सौंदर्याची व्याख्या ही त्वचेच्या रंगावरून किंवा शरीराच्या आकारावरून ठरवले जाते. मनोरंजन क्षेत्रही त्यापैकीच एक आहे. पण अशा काही मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी झिरो साइज फिगर या ट्रेंडला नाकारून सौंदर्याची नवी व्याख्या सर्वांसमोर आणली. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वजनाचा न्यूनगंड न बाळगता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मराठी अभिनेत्री कोण आहेत ते पाहुयात..

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘कुमारी गंगूबाई नॉन-मॅट्रिक’ या मालिकेतील निर्मिती यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत त्यांच्यासोबत प्रसिद्ध विनोदी कलाकार पंढरीनाथ कांबळे यांनी काम केले होते. 2004-2006 मध्ये ही मालिका सर्वात लोकप्रिय मालिका ठरली. अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये निर्मीती यांनी काम केले आहे.
मराठी मालिकांबरोबरच कबीर सिंग या हिंदी चित्रपटामध्ये भूमिका साकारणारी डॅशिंग अभिनेत्री विनिता खरातने कधीच ‘साइज झिरो’चा विचार केला नाही. तिच्या बोल्ड आणि हटके व्यक्तिमत्वामुळे वनितानं तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमधून प्रेक्षकांतच्या भेटीस येणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार तिच्या विनोदी शैलीने अनेकांची मनं जिंकते.
बिग बॉस मराठी सिझन- 1 मधील अभिनेत्री आरती सोलंकीचे बोल्ड आणि बिंधास्त व्यक्तिमत्व प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेती स्विटू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमधील लतिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षय नाईकच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अक्षया ही प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here