लावलेल्या वृक्षरोपांपैकी जवळपास 95 टक्के इतकी वृक्ष यशस्वीपणे वाढली आहेत. उन्हाळ्यात त्यांना योग्य वेळी पाणी देऊन संगोपन करण्यात आले होते.

अक्कलकोट (सोलापूर): अक्कलकोट तालुक्यात मागील वर्षी NTPCच्या वतीने तसेच सामाजिक वनीकरण यांच्या सहकार्याने गौडगाव (खुर्द) येथे लावलेल्या 7110 वृक्षांचे जोमदार वाढ झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तर दुसऱ्या बाजूस अक्कलकोट ते नळदुर्ग या झालेल्या नवीन रस्त्यावर 2550 नवीन वृक्षलागवड करण्यात आले.

Also Read: अक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू

सामाजिक वनीकरण विभाग आणि एनटीपीसीच्या वतीने गौडगाव खु. येथे 6.4 हेक्टर जमिनीवर 7110 झाडांची लागवड करून एक वर्षपूर्ण झाल्याने आज झाडांचा वाढदिवस साजरा केला. यात वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडुलिंब, सिस, कारंज, सीताफळ, चेरी, औदुंबर या झाडांचा यामध्ये समावेश आहे. लावलेल्या वृक्षरोपांपैकी जवळपास 95 टक्के इतकी वृक्ष यशस्वीपणे वाढली आहेत. उन्हाळ्यात त्यांना योग्य वेळी पाणी देऊन संगोपन करण्यात आले होते.

Also Read: अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणीची लगबग सुरु

यावेळी वनक्षेत्रपाल अमित मुळीक, वनपाल पवन आहेर आदींची उपस्थिती होती. तर दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन ही काळाची गरज बनली आहे.

शनिवारपासून राष्ट्रीय महामार्ग विभागा मार्फत नळदुर्ग, अक्कलकोट रस्त्यालगत साखर कारखान्याजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, आपटे, पळस, रेनट्री, सप्तपर्णी, गुलमोहर, शिवरी, कडूलिंब आदी 2570 झाडांची लागवड करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बसवराज बाणेगाव, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे व अन्य उपस्थित होते.

Also Read: कर्नाटकातील व्यक्तीचा खून ! अक्कलकोट येथील विहिरीत आढळला दोन तुकड्यांमध्ये मृतदेह

एनटीपीसी आणि सामाजिक वनीकरण विभागाने कौतुकास्पद कार्य करत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन केले आहे. यासाठी मागील वर्षभर परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे मनापासून अभिनंदन.

-सचिन कल्याणशेट्टी, आमदार,अक्कलकोट

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here