नाशिक : अस्थमाची समस्या असणाऱ्यांना फुफ्फुसापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहचत नाही व श्वास घेण्यास त्रास होतो. याची व्यवस्थित काळजी न घेतल्यास ही समस्या अस्थमा अटॅकचे (Asthma attack) कारण ठरू शकते. पावसाळ्यातील, ढगाळ, थंड हवामान देखील दम्याची लक्षणे वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. तरुणाई जास्त धुम्रपान करत असल्यामुळे दम्याचा धोका वाढला आहे. निसर्गाशी सुसंगत जीवन जगल्यास दम्याचे प्रमाण कमी होईल असे मत तज्ञांनी मांडले आहे. (smoking-increases-the-risk-of-asthma-In-the-rainy-season)

योग्य आहार घेणे ठरते उपयुक्त

दम्याने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी ऋतूबदल सर्वाधिक कठीण काळ असतो. वातावरणात सतत बदल होत असल्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होण्यास सुरवात होते. नाशिकमध्ये दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आलेली नाही. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे पूर्ण श्वास घ्यायला त्रास होत असल्याने दम्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते. दम्याला नियंत्रित करण्यासाठी औषधांचे नियमित सेवन करण्यासह इन्हेलर्स, ट्रिगर टाळून योग्य आहार घेणे फायद्याचे ठरते.

Also Read: अ‍ॅसिडीटीने हैराण आहात? मग आवर्जून वाचा…

Asthma

अस्थमा अनुवांशिक आजार…

ऋतू बदलताना दम्याच्या घटनांमध्ये वाढ होते. ऋतू बदलत असताना दमा झालेल्या व्यक्तीला वातावरणातील बदल असह्य करतात सध्याच्या परिस्थितीत रुग्ण रुग्णालयात जात नाहीत किंवा नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत त्यामुळे दम्याच्या वाढीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते. योग्य उपचार घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. कधी कधी हा आजार अनुवांशिकही असतो.

बदलत्या जीवनशैलीने धोका अधिक

”दम्याच्या रुग्णांना ढगाळ वातावरणात पूर्ण ऑक्सिजन मिळत नाही. बाहेरचे खाणे, प्रवास अशा गोष्टींमुळे दम्याचा त्रास वाढतो. दोन ऋतुंमधल्या काळात रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. निसर्गाशी सुसंगत जीवन जगल्यास दम्याचे प्रमाण कमी होईल. जीवनशैली बदलल्यामुळे धोका वाढला आहे.” – डॉ. सुनील औंदकर

(smoking-increases-the-risk-of-asthma-health-news)

Also Read: वय नसतानाही डोळ्यांमुळे म्हातारे दिसताय? जाणून घ्या कारण

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here