मुंबई – बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री म्हणून फातिमा सना शेखच्या(fatima sana shekh) नावाचा उल्लेख करावा लागेल. तिनं मोठ्या प्रभावीपणे आपल्या नावाचा ठसा बॉलीवूडमध्ये उमटवला आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या फातिमाचा एक नवा लुक सध्या व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये आहे. फातिमाच्या हॉटनेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (dangal actress fatima sana shaikh latest hot photoshoot blow yst88)

काही दिवसांपूर्वी फातिमा चर्चेत आली ते आमीर खानच्या घटस्फोटामुळे. आमीर आता तिच्याशी लग्न करणार अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मात्र त्यात तथ्य़ नसल्याचे दिसून आले आहे.
फातिमाचा सध्याचा नवीन लूक भलताच फॉर्मात आहे. त्यामुळे तिनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील तिनं वेगवेगळ्या प्रकारे चाहत्यांना आपल्या लूकची झलक सादर केली होती.
दंगलपासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्य़ा फातिमानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लुडोमध्येही तिनं प्रभावी अभिनय केला होता. त्यात ती पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव यांच्याबरोबर दिसली होती.
फातिमाचा आताचा जो लूक आहे त्यामध्ये तिनं प्रिटेंड ओव्हरसाईज काही कपडे घातले आहेत. त्यात बेबी ब्लु क्रॉप, काही डेनिमचे कपडे आहेत. मात्र त्यात ती कमालीची सुंदर दिसते आहे.
आमिरच्या घटस्फोटामुळे फातिमा चर्चेत आली होती. मात्र तिनं आपल्या आणि आमिरच्या चर्चांना फारसे महत्व दिलेलं नाही. आमीरला मी आपला मार्गदर्शक मानते. असं तिचं म्हणणं आहे.
लुडोनंतर फातिमानं अजीब दास्तांमध्ये काम केलं होतं. त्यातही तिच्या वाट्याला लक्षवेधी भूमिका आली होती. त्या भूमिकेनं तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. समीक्षकांनी देखील तिच्या त्या भूमिकेचं कौतूक केलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here