मुंबई – बॉलीवूड सेलिब्रेटींना नेमकं काय झाले हे कळायला काही मार्ग नाही. याचे कारण म्हणजे ते चूकीची माहिती बिनधास्तपणे सोशल मीडियावर शेयर करताना दिसत आहे. काल मीराबाई चानुनं (mirabai chanu) ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं. तिनं 40 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून दिलं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. दुसरीकडे प्रिया मलिक नावाच्या खेळाडूनं कुस्ती क्रिडा प्रकारात यश संपादन केलं होतं. मात्र आता ती चर्चेत आली आहे ते बॉलीवूड सेलिब्रेटींच्या एका चुकीमुळे. (bollywood celebs mistakenly congratulated priya malik for winning gold medal in tokyo olympics yst88)
त्याचे झाले असे की, प्रिया मलिकनं विश्व कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. मात्र यावेळी अनेकांचा असा गैरसमज झाला की, तिनं ऑलिम्पिकमध्येच ही कामगिरी केली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. काल मिराबाई चानुनं मेडल मिळवल्यानंतर तिचं अभिनेत्री टीस्का चोप्रानं कौतूक केलं. मात्र त्यामुळे ती ट्रोलही झाली. तिनं मिराबाईच्या ऐवजी दुसऱ्याच एका खेळाडूचा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल केला होता. त्यामुळे टिस्काला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
आता ही बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी तिच चूक पुन्हा केली आहे. त्यात अभिनेत्री भूमि पेडणेकर, मिलिंद सोमण आणि वत्सल शेठ यांचा समावेश आहे. चाहत्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सुनावण्यास सुरुवातही केली आहे. त्यांनी त्या स्पर्धेचे नाव चूकीचे लिहून एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. प्रिया मलिकवर देखील आता सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. तिलाही अनेकांनी शुभेच्छा देऊन धन्यवाद दिले आहेत. यावेळी काही सेलिब्रेटींना असे वाटले की, प्रियानं यंदाच्या ऑलिम्पिकमध्येच हे यश मिळवले आहे.


अभिनेता मिलिंदनं व्टिट केलं होतं की, धन्यवाद प्रिया मलिक, गोल्ड टोक्यो ऑलिम्पिक. काही वेळानं मिलिंदच्या लक्षात आपली चूक आली. त्यानंतर त्यानं आपली चूक सुधारुन घेतली. दरम्यान एका युझर्सनं त्याला लिहिलं, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, थोडं गुगलं केलं असतं तरी माहिती मिळाली असती. त्यांनी व्टिट करुन पुन्हा माफीही मागितली आहे.

Also Read: डॉमिनोजकडून मिराबाई चानुला ‘लाईफटाईम’ पिझ्झा फ्री
भूमीनं देखील तिच्या इंस्टावर प्रिया मलिकचा एक फोटो शेयर केला होता. त्यात तिनं लिहिलं होतं की, बेबी गोल्ड, गोल्ड, गोल्ड प्रिया मलिक टोक्यो ऑलिम्पिक. यानंतर भूमीनं तिचं व्टिट डिलिट केलं आहे.
Esakal