नाशिक म्हटलं म्हणजे प्रत्येकालाच आवडत ते इथलं वातावरण.
अगदी पुण्या-मुंबईतील लोक सुट्ट्यांमध्ये चिल्ल करायला नाशिकलाच येतात. नाशिकचा निसर्ग, नाशिकची खाद्य संस्कृती, नाशिकची माणसं सर्वांनाच आपलसं करतात. त्याचबरोबर नाशिकच्या पर्यटनात भर घालतात ते येथील प्रेक्षणीय ठिकाणं.

त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, कश्यपी डॅम, पांडवलेणी, गंगापूर धरण आणि अजून बरच काही!
ही ठिकाण जेवढी आकर्षक आहेत तेव्हढंच आकर्षक आहे त्यांना भेट द्यायला जाताना रस्त्याने दिसणारा निसर्ग. आपल्या कॅमेरात आवर्जून टिपावा ईतके विलोभनीय दृश्य असते.
आणि त्यात पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेला निसर्ग बघितला की मन अधिक प्रफुल्लित होते हे नक्की.
तर बघूया त्र्यंबकेश्वर रस्त्याची मनमोहक निसर्गचित्रे.

आभाळाला गवसणी घालणारे डोंगर, आजुबाजूला हिरवे रान अन् वाटेत बरसणारा पाऊस…!
आपल्या कॅमेरात आवर्जून टिपावा ईतके विलोभनीय दृश्य
निसर्गाची अदा!
डोंगर माथ्याहून वाहणारे झरे मन प्रसन्न करतात
हिरवीगार शाल पांघरलेला निसर्ग बघितला की मन अधिक प्रफुल्लित होते. त्यामुळे प्रत्येकजण वाटेत थांबुन फोटो काढतोच.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here